वरोरा जवळ येन्सा येथे अपघात.

येन्सा जवळ अपघात

: वरोरा-चंद्रपूर महामार्गावरील येन्सा गावाजवळ झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात एका लहान मुलासह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली.

नागपूर येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, मागून भरधाव येणाऱ्या इनोवा क्रमांक एमएच ३
४ बीव्ही ८८८९ या क्रमांकाच्या गाडीने मालवाहू ट्रकला धडक दिली. यामध्ये कमलेश राम (३८), श्रेयस राम (८), जिजाप्रसाद (३०), सुनंदा राठोड (४५) आणि शेरसिंग थापा (५२) (सर्व रा. चंद्रपूर) हे जखमी झाले. यातील श्रेयस आणि जिजाप्रसाद यांना गंभीर दुखापत झाली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर सर्व जखमींना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.


Comments