कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार*.मागील वर्षाची ३ कोटी 26 लाख रुपयाची उलाढाल *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये दिग्गज अजमावनार आपले नशीब

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार.

मागील वर्षाची ३ कोटी 26 लाख रुपयाची उलाढाल

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये दिग्गज अजमावनार आपले नशीब

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील सगळ्यात मोठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 28 एप्रिलला  दिग्गज आपले नशीब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजमावित आहे.

मागील वर्षी 3 कोटी 26 लाख उलाढाल असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा भाजप , शिवसेना आणि काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये पक्ष जरी नसला तरी पॅनलच्या स्वरूपात ही निवडणूक लढवली जाते. यावेळी काँग्रेस गट विरुद्ध इतर सर्वजण एकत्र झाले असून शिवसेना पॅनल बाहेरून लढत आहे. 
येत्या 28 एप्रिल ला वरोरा, शेगाव, माढेळी, टेंभुर्डा या ठिकाणी मतदान होणार असून मतदार यादीनुसार 777 सेवा सहकारी संस्थेचे मतदार , 619 ग्रामपंचायतचे मतदार, 92 अडते व्यापारी मतदार,56 हमाल मापारी मतदार, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत.

सहाय्यक जिल्हा उपनिबंधक अधिकारी व जिल्हा विशेष लेखा परीक्षक निवडणूक अधिकारी यांच्याकडे एकूण 86 फॉर्म आले आहेत. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा यांनी सूचना फलकावर 63 वैध उमेदवारची यादी जाहीर केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयानंतर  बाकीच्या उमेदवारी अर्जावर विचार करण्यात येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकी मध्ये एकूण 18 जण निवडून येणार आहेत. 
 *सेवा सहकारी संस्थांमधून 11, ग्रामपंचायत मधून 4, अडते व्यापारी मधून 2, आणि 1 हमाल*
वरोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, सेवा सहकारी संस्था निर्वाचित सदस्य मतदान करणार असून ही निवडणूक येणाऱ्या नगरपालिका ,जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
या निवडणुकीमध्ये माजी सभापती राजू चिकटे,विजय देवतळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, प्रमोद मगरे, दहेगाव चे सरपंच विशाल पारखी, जयंत टेंमूर्डे, बाळू भोयर, दत्ता बोरेकर , विशाल बदखल ,शरद कारेकार आधी दिग्गज राजकारणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मतदार कमी असल्याने पहिलेच मतदारांना प्रलोभन देऊन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न पॅनलच्या मागे असणारे राजकारणी करत असल्याचा दावा  अपक्ष पॅनल उमेदवारांनी केलेला आहे. एकंदरीत काँग्रेस गटा विरुद्ध इतर सर्व एकवटले असून ही निवडणूक चुरशीची ठरणार हे मात्र नक्की.

 *मागील पंचवार्षिक योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजना*

शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तात्काळ मदत.

मराठा चारिटेबल ट्रस्ट तर्फे शेतकऱ्यांसाठी ट्रॅव्हलर गाडीची सोय.

शेतकऱ्यांसाठी उशीर झाल्यास राहण्याची व जेवणाची सोय.

नवीन गोडाऊन शेड, शेतकरी निवास ,वॉल कंपाऊंड बांधकाम.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शॉपिंग कॉम्प्लेक्स ची निर्मिती.

मागील पंचवार्षिक योजनेत या सगळ्या बाबी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.

जाहिरात 

समीरभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हॉइस ऑफ मेडिया पत्रकार संघटना
सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ टोंगे 

Comments