पोलखोल चित्रप्रदर्शनीतून सरकारची पोलखोल* _काँग्रेसच्या हाथ से हाथ जोडो_ _अभियानाला वरोरा येथे सुरूवात_
_काँग्रेसच्या हाथ से हाथ जोडो_ _अभियानाला वरोरा येथे सुरूवात
*वरोरा :* काँग्रेस पक्षाच्या हाथ से हाथ जोडो अभियाना अंतर्गत वरोरा काँग्रेसतर्फे सरकार विरोधात पोलखोल चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.या चित्रप्रदर्शनीतून विविध चित्रांच्या माध्यमातून सरकारच्या अपयशाचे प्रदर्शन करण्यात आले. आज खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन झाले.
वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी सामान्य नागरिकांना मोदी सरकारच्या अन्यायकारक निर्णयाबाबत संवाद साधून पत्रके वाटण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, नगरपालिकेचे माजी गटनेते गजानन मेश्राम, माजी सभापती विशाल बदखल, छोटूभाई शेख,प्रमोद मगरे, माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग,मनोहर स्वामी,सुनंदा जिवतोडे माजी जि. प. सदस्य महिला वरोरा शहर अध्यक्षा दिपाली माटे,शिरोमणी स्वामी, मीना राहटे, प्रतिमा जोगी, चंद्रकला चिमुरकर, मंगला पिंपळकर, सुनीता साळवे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल आसूटकर, निलेश भालेराव,बाळू पिसाळ, राहुल देवडे,माजी नगरसेवक सनी गुप्ता, प्रमोद काळे, सलीम पटेल सुभाष दांदले, विजय पुरी, राजेंद्र बनसोड, अय्युब पठाण,आसिफ रजा, राहील पटेल,मेघशाम सिडाम, संजय घागी, शेळकी गुरुजी, अनिरुद्ध देठे, सुरज बावणे, सरपंच प्रवीण भोयर,राजु डाफ, सुरेश टेकाम, लक्ष्मण बैस, गिरीधर कष्टी, महादेव आसुटकर, गणेश काळे, शरद आसुटकर,पराग नरडे,मनिष जयस्वाल यांची उपस्थिती होती.
देशात महागाई आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. देशातील लोकशाही पायदळी तुडवली जात आहे त्यामुळे सामान्य माणसात सरकार विरोधात रोष आहे. हा रोष चित्रप्रदर्शनीतून दिसून आला. चित्रप्रदर्शनी पाहणी करण्यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती.
जाहिरात.
Comments
Post a Comment