वरोरा येथे घरासमोरून दुचाकी चोरी; २० हजारांची होंडा पॅशन लंपास

वरोरा येथे घरासमोरून दुचाकी चोरी; २० हजारांची होंडा पॅशन लंपास बातमी: चेतन लूतडे  वरोरा : शहरातील सुभाष वॉर्ड परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुशर्रफ नैमुद्दीन सय्यद (वय 28) हे आपल्या कुटुंबासह सुभाष वॉर्ड येथे वास्तव्यास असून खाजगी व्यवसाय करतात. त्यांचे मामा मोहम्मद रिजवान ईब्राहीम शेख (रा. फैजनगर, यवतमाळ) यांच्या मालकीची काळ्या-लाल रंगाची होंडा पॅशन (क्र. MH 29 A 5854) ही मोटारसायकल सध्या मुशर्रफ सय्यद वापरत होते. दि. 23 एप्रिल 2026 रोजी त्यांनी सदर दुचाकी घरासमोर उभी करून सावंगी मेघे येथे गेले होते. दरम्यान सायंकाळी सुमारे 7.30 वाजेपर्यंत गाडी जागेवर होती, मात्र त्यानंतर अज्ञात चोरट्याने ती लंपास केल्याचे समोर आले. याबाबत कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र गाडी आढळून आली नाही. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरु...

राजूर ते भांदेवाडा रस्त्याची दुरावस्था दूर करा: किशोर टोंगे यांची मागणी

राजूर ते भांदेवाडा रस्त्याची दुरावस्था दूर करा: किशोर टोंगे यांची मागणी


भांदेवाडा येथे विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज यांचे संस्थान असून मोठ्या प्रमाणात भक्त संप्रदाय बाबांच्या दर्शनाला भांदेवाडा येथे
 जात असतो. मात्र राजूर ते भांदेवाडा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने हा रस्ता तातडीने मार्गी लावावा अशी मागणी युवा नेते किशोर टोंगे यांनी केली.

चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सद्गुरू श्री जगन्नाथ बाबा यांना मानणारा मोठा वर्ग असून नित्यनियमाने बाबांच्या दर्शनासाठी लोकं उपस्थित राहतात. शासनाने लक्ष घालून या तीर्थक्षेत्राचा विकास घडवून आणावा. यातून पर्यटन आणि विकासाला चालना मिळेल, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल.

यासाठी पायाभूत सुविधाची गरज असून रस्ता प्राधान्याने दुरुस्त करावा व भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून अशी मागणी त्यांनी केली.

Comments