गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

ठेवीदारांसाठी विश्वास आणि सुरक्षितता महत्वाची* आमदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन*

*ठेवीदारांसाठी विश्वास आणि सुरक्षितता महत्वाची*

*आमदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन*

वरोरा - गुंतवणूक, बचत, आणि व्यवहार करताना प्रत्येक बँकेमध्ये ठेवीदारांची सुरक्षितता आणि विश्वास महत्त्वाचा आहे. कायम राहिल्यास देशातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन  आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटच्या वरोरा येथील नवीन शाखेचा लोकार्पण सोहळा अतिशय उत्साहात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते झाले. 
यावेळी श्री.जितेंद्रजी वासनिक (चेअरमन नागपूर सिटी मल्टिस्टेट) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.रोहीत बोम्मावार, उपव्यवस्थापक वंदना नखाते ठवकर, प्रशासकीय अधिकारी श्री. भरतकुमार नरेडला, कर्ज विभागप्रमुख श्री.विवेक बाभरे तसेच सर्व शाखांचे व्यवस्थापक, समस्त संचालक मंडळ ,शाखा व्यस्थापन समिती सदस्य,अधिकारी कर्मचारी,दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधी  वृंद व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

जाहिरात..

Comments