मनसेने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली ब्लास्टिंगवर प्रतिबंध लावण्याची मागणी.
वरोरा :-
वरोरा तालुक्यातील एकोना खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणांत ब्लास्टिंग होतं असल्याने या परिसरातील जी गावे आहेत त्या गावांतील घरांना हादरे बसून भिंतींना भेगा पडत आहे. मागील अनेक दिवसांपासून हे हादरे जणू भूकंपाचे झटके असल्याप्रमाणे गावकऱ्यांना वाटतं असून घरात असताना वरील स्लॅब कोसळतो की काय ? असा भास व्हायला लागतो, त्यामुळे या परिसरातील एकोना, चरुरखटी, पांझुर्णी, वनोजा, मार्डा व वरोरा शहरातील काही भाग प्रभावित होतं असल्याने प्रशासनाने या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन वेकोलि प्रशासनासोबत बैठक बोलावून त्यांवर उपाययोजना करावी अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रसंगी तहसीलदार यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आपण वेकिलि प्रशासनाकडे या संदर्भात माहिती मागवून एक बैठक आयोजित करून त्यांवर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के,महिला तालुका अध्यक्षा रेवती इंगोले, शहर उपाध्यक्षा. अनिता नकवे. शुभांगी मोहरे, शहर उपाध्यक्ष दिलीप उमाटे, विभाग अध्यक्ष राजू धाबेकर, धनराज चंदनबटवे, उत्तम चिंचोलकर, दिलीप ठाकरे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment