ठाकरे गटातील आमदारांना पक्षाचा व्हिप लागू होणार का


ठाकरे गटातील आमदारांना पक्षाचा व्हिप लागू होणार का


 केंद्रीय निवडणूक आयोगाना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. यामुळे आता ठाकरे गटातील आमदारांना पक्षाचा व्हिप लागू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही सर्व आमदारांना व्हिप लागू होणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला पक्षाचा व्हिप लागू होणार नसल्याचे सांगितले आहे. 

'शिवसेनेचा व्हिप आपल्या आमदारांना लागू  होणार नाही, कारण निवडणूक आयोगाने याअगोदर दोन गट मान्य केले आहेत. त्यामुळे पक्षाचा व्हिप लागू होत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

'आम्ही कार्यकारणीची झालेल्या सभेची सीडी दिली. यात आयोग म्हटले कव्हरींग लेटर दिलेलं नाही. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही, निवडणुकी पद्धतीने आयोग नेमला पाहिजे. आताच निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे,  अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. 


जाहिरात..
रॉयल प्लाझा येथे स्पेशल ऑफर.
टेस्टी फूड साठी एकदा येऊनच बघा....


Comments

  1. जाहिरातीसाठी संपर्क
    9579734429

    ReplyDelete

Post a Comment