सोईट-माढेळी-वरोरा ते वणी-वरोरा बायपास करीत जमीन हस्तांतरास मान्यता* *खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश*

*सोईट-माढेळी-वरोरा ते वणी-वरोरा बायपास करीत जमीन हस्तांतरास मान्यता* 

*खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश* 

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील सोईट -माढेळी वरोरा ते वणी वरोरा प्रस्तावित बाय पास रोडच्या बांधकामाकरिता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या मालकीची संपादीत जमीन डब्लु सी एल माजरी एरिया कुचना यांना हस्तांतरण करण्याकरिता महसूल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित हा बायपास मार्ग आता पूर्ण होणार आहे. यासाठी अनेकदा खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

या संपादीत जमिनीच्या रस्त्याच्या कामाकरण्याकरिता संपादित जमिनीचे भुधारक पी.डब्लु. तडस (रा. चंद्रपूर) यांनी निवेदन सादर केले होते. यावर वरोरा शहरातील वाढत्या रहदारीच्या दृष्टीने पर्यायी जागा भुमापन क्रमांक १२/६५ /१९९६-९७ मौजा वरोरा येथील सदर जमिन कार्यकारी अभियंता चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक १ चंद्रपूर यांना सदर जमिन आपल्या विभागात आवश्यकता आहे काय? या संदर्भात विचारणा करण्यात आली होती.
या विषयाच्या अनुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ८.७७ हेक्टर आर जमिनीपैकी ५.७५ हेक्टर आर जमिन एरिया जनरल मॅनेजर मांजरी एरिया यांना हस्तांतरीत करण्याचा शासन स्तरावर प्रस्ताव  महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई पत्र क्र. संकीर्ण २०२२/ प्र. क. ५६/ अ. १ दिनांक २० फेब्रुरवारी २०२३ अन्वये  मंजुर करण्यात आला आहे. 

त्यामुळे डब्लु सी एल च्या हस्तांतरीत करण्यात आलेल्या जागेवर वरोरा बायपासची निर्मिती करुन वरोरा शहरात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करता येईल, या अनुषंगानेमहसूल विभागाचे उपसचिव सुनील कोठेकर यांनी हा आदेश पारित करून हा निर्णय घेतला आहे.

सदर जमीन काँक्रिट रस्ता बांधकामासाठी वापरण्यात यावी, जमिनीच्या वापरात अथवा हस्तांतरण करताना शासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. जमिन हस्तांतरणसंदर्भात द्यावयाचे अधिमूल्य आकारणी ही अटी व शर्थीच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करावी. वेकोलि ही जमिन भोगवटदार वर्ग २ राहणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

जाहिरात
हॉटेल रॉयल प्लाझाला अवश्य भेट द्या..

Comments