धनोजे कुणबी समाज वधू - वर परिचय मेळावा २०२३ मध्ये कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक महोत्सव
धनोजे कुणबी समाज वधू - वर परिचय मेळावा २०२३ मध्ये कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक महोत्सव
चंद्रपूर : आपल्या समाजातील व्यक्ती मोठ्या पदावर जात असेल तर सर्वानी तन- मन- धनाने सहकार्य केले पाहिजे. धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर समिती अध्यक्षानी समाजाला राजकारणा पासून दूर ठेवले पाहिजे असा सल्ला देत समाजोपयोगी, समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी पूर्ण ताकदीने कार्य करावे, समाजात दुहीची बीजे रोवणे घातक असून भावी पिढी माफ करणार नाही. राजकारण व पक्ष न बघता मला २०१९ च्या निवडणुकीत आपल्या समाजाने भक्कम पाठिंबा दिला. त्याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी समाजबांधवांचे आभार मानले.
धनोजे कुणबी समाज वधू - वर परिचय मेळावा २०२३ मध्ये कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून सुवर्ण संगम साधल्याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी आयोजन समितीचे कौतुक केले.
या मेळाव्यात रेशीमगाठी या विशेषकांचे प्रकाशन झाले. हा विशेषांक उपवर - वधू साठी उपयुक्त असून भूमिपुत्रांच्या मेळाव्यात कृषी महोत्सव भूषणावह असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, वसंत जिनींगचे अध्यक्ष आशिष कुलसंगे, धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगरचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपूते, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, चंद्रपूर मनपाचे स्थायी समितीचे माजी सभापती राहुल पावडे, श्रीधर मालेकर, संजय खाडे, देविदास काळे, ऍड. संतोष कुचनकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर बोलताना म्हणाल्या कि, धनोजे कुणबी समाजात जन्माला आलो. याच्या अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो. आणि दुसरीकडे समाजातील महिलांचे पाय मागे खीचल्या जातात. हि बाब दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे महिलांचे मनोबल कमी होत असते. परंतु मी घाबरणारी महिला नसून लढणारी महिला आहे. मी १२ पुरुषा विरोधात निवडणूक लढूनआलेली लोकप्रतिनिधी हे. प्रामाणिकपणे काम करणारी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.
जाहिरात
Comments
Post a Comment