महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभे मध्ये एकत्र निवडणूका लढणार.आ. अनिल देशमुख

महाविकास आघाडी येणाऱ्या  विधानसभे मध्ये एकत्र निवडणूका लढणार.
आ. अनिल देशमुख

वरोरा
चेतन लूतडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख वरोरा भद्रावती दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मोरेश्वर टेंमूर्डे यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या परिवारास भेट देत आदरांजली व्यक्त केली.

राजकारणातल्या बऱ्याच दिवसाच्या घडामोडीनंतर आमदार अनिल देशमुख व त्यांचे सहकारी रमेश बंग  हे स्वर्गीय मोरेश्वर टेंभुर्डे  यांच्या राहत्या घरी भेटण्यासाठी आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांचा निरोप त्यांच्या परिवारास कळविला. व राष्ट्रवादी परिवारातर्फे शोक व्यक्त केला. यावेळी टेंमूर्डे यांच्या पत्नी व अमन आणि जंयत दोन मुलांना भेट देत सांत्वना व्यक्त केली.

यावेळी पत्रकारांसोबत बोलताना महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता प्रस्थापित करेल अशी आशा व्यक्त करत भाजप सरकारने बाकीच्या पक्षातील लोकांना सरकारी यंत्रणामार्फत वेठीस धरले असे मत व्यक्त केले.  ईडी ही सरकारी यंत्रणा काँग्रेसने स्थापन केली असून त्यांनी सुद्धा त्याचा फायदा करून घेतला नाही. मात्र या सरकारने त्याचा गैरफायदा केल्याचा आरोप त्यांनी यावेळी व्यक्त केला.

येणाऱ्या महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 100% सत्तेत येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाली असून येणाऱ्या दिवसात ही पोकळी नक्की भरून निघेल असा विश्वास व्यक्त केला.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य , हिराचंद बोरकुटे, दीपक ज्यस्वाल,जयंत टेमुर्डे, अमन टेमुर्डे,विशाल पारखी, सुधाकर रोहनकर ,ज्ञानेश्वर ढोके, अशोक पोपळे, सुशांत लांडगे,रंजना पारशिवे, सुशीला तेलमोरे,सुनीता राऊत आधी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जाहिरात 
संपर्क चेतन लूतडे वरोरा ९५७९७३४४२९
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास भाऊ नेरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments