*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!

*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!*  *आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; राजुरा शहराच्या वैभवात भर पडणार!* राजुरा, दि.15/3/2026 राजुरा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि शहराची प्रमुख ओळख असलेल्या नगरपरिषदेच्या समोरील 'माजी मालगुजारी तलावा'च्या पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत या तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या अविरत पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेले तलावाचे काम आता पुन्हा जोमाने सुरू होणार असून राजुरा शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे. आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासूनच देवराव भोंगळे यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले होते. यापूर्वी या तलावाचे काम सुरू झाले होते, परंतु तांत्रिक अडचणी आणि निधीच्या कमतरतेमुळे ते बंद पडले. आवश्यक निधीचा प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित होता. यावर तोडगा काढण्...

गाळेधारकांच्या निवेदनावर सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा - खासदार बाळुभाऊ धानोरकर

*गाळेधारकांच्या निवेदनावर सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा - खासदार  बाळुभाऊ धानोरकर*

*गोल बाजार येथील गाळेधारकांसाठी मनपात आढावा बैठक*

*कोरोनाच्या २ वर्षांची रक्कम माफीबाबत निर्णय घेण्यात यावा*  

चंद्रपूर २१ फेब्रुवारी - गोल बाजार येथील गाळेभाड्यात अचानक केलेली वाढ गाळेधारकांना अन्यायकारक वाटत आहे.ऑनलाईन मार्केटमुळे अनेक व्यापारी अडचणीत आहेत तसेच कोरोना काळामुळेही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे तेव्हा महानगरपालिकेने भाडेवाढीबाबत सारासार विचार करून निर्णय घेण्याचे निर्देश मा. खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी दिले.   

    १९९१ मध्ये महानगरपालिका व गोल बाजार येथील गाळेधारक यांच्यात झालेल्या करारानुसार गाळेभाड्यात दर ३ वर्षांनी १५ टक्के वाढ अपेक्षीत असतांना रेडीरेकनरच्या दरानुसार २०१२ मध्ये भाड्याची आकारणी मनपातर्फे करण्यात आली.भाडेवाढ गाळेधारकांना अन्यायकारक वाटल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. भाडेवाढ कमी करण्यासंबंधी गोल बाजार येथील गाळेधारकांनी जे निवेदन दिले आहे त्यावर सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात यावा.    

   ऑनलाईन मार्केटमुळे अनेक व्यापारी अडचणीत आहेत तसेच कोरोना काळामुळेही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे तेव्हा सारासार विचार करून महानगरपालिकेने भाडेवाढीबाबत निर्णय घेण्याचे तसेच कोरोनाच्या २ वर्षांची रक्कम माफ करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश मा. खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी महानगरपालिका येथे आयोजीत आढावा बैठकीत दिले. 

    मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादीत असल्याने नागरीकांनीही कर नियमित भरावा. वारसान साठी असलेले हस्तांतरण शुल्क सुद्धा कमी करण्यात यावे. दुकान गाळेधारकांसाठी भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित व्हावा या दृष्टीने मनपातर्फे NASH प्रणाली सुरु करण्यात आली असुन नियमित कर भरणा करणाऱ्या गाळेधारकांना रेंटमध्ये ५ टक्के सुट मिळणार आहे.सदर योजना चांगली असुन गाळेधारकांनी याचा फायदा घ्यावा व भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. 

   मनपा व गाळेधारक यांची समन्वय समिती नेमण्यात यावी तसेच गाळेधारकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंगची सुविधा या मुलभूत सुविधा मिळतील याची काळजी घ्यावी. बाबुपेठ येथील अटलबिहारी वाजपेयी पार्क येथील देखभाल दुरुस्ती बरोबर नसल्याच्या तक्रारी आहेत तेव्हा तेथील ठेकेदाराला सुचना देण्यात याव्या. नगिनाबाग येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे विनापरवानगी कार्यक्रम घेण्यात येतात. प्रशासनाने दखल घेऊन सभागृह सर्वांना उपलब्ध राहील याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.           
  
   याप्रसंगी वरोरा येथील आमदार प्रतिभा धानोरकर,आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगरसेविका सुनीता लोढीया तसेच इतर अधिकारी उपस्थीत होते.

जाहिरात

Comments