शिवसेना पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख शुभांगी ताई नांदगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेनेचा महिला मेळावा.

शिवसेना पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख शुभांगी ताई नांदगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेनेचा महिला मेळावा.

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे बचत गट महिलांचे सक्षमीकरण करणार


वरोरा२१/२/२३
चेतन लूतडे

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगा तर्फे चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंद उत्सव पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी नियुक्त्या झाल्या असून पूर्व विदर्भाची संपर्कप्रमुखाची जबाबदारी शुभांगीताई नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया वरून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी त्या आल्या होत्या . त्यामुळे तालुक्यातील महिला जिल्हा प्रमुख योगिता लांडगे यांनी महीला मेळाव्याचे आयोजन कुणबी भवान येथे करण्यात आले होते.

यावेळी संपर्कप्रमुख नांदगावकर यांनी विविध महिलांच्या समस्या ऐकून घेत बेरोजगारी, औद्योगीकरण, महिला बचत गट, या क्षेत्रात प्रामुख्याने काम करण्याचा मानस दाखवला. व या समस्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात येणार अशी ग्वाही दिली. नांदगावकर यांच्या नियुक्तीने पूर्व विदर्भात शिवसैनिका मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून महिला सक्षमीकरणाचे बरीव कार्य करण्याचे आश्वासन दिले.
यादरम्यान वरोरा येथील विश्रामगृहात सोयींचा अभाव पाहत तेथील अधिकाऱ्यांचे कान टोचले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाळखोरी निघालेल्या कंपन्यांचा त्यांनी अभ्यास केला असून येणाऱ्या दिवसांमध्ये बेरोजगार महिला व युवकांना रोजगार देण्याबाबत शंभर टक्के काम करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महिलांच्या समस्या समजावून घेत जिल्हाप्रमुख योगिता लांडगे यांना सुद्धा निवेदन घेऊन रितसर समस्यांना मार्गी लावण्याचे आदेश दिले.
या मेळाव्यात शेकडो महिला कार्यकर्त्यांनी नांदगावकर यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात आला.

  संपर्क प्रमुखांचा पूर्व विदर्भाचा दौरा झंजावती ठरणार असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला शिवसेना सक्षम असल्याचे मत जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमासाठी संपर्कप्रमुख शुभांगी ताई नांदगावकर व शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख बंडू हजारे व जिल्हाप्रमुख नितीन मते , महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे , आशिष ठेगणे, यांच्या उपस्थितीत पार पडला . यावेळी शिवसेनेचे शेकडो महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
हॉटेल रॉयल्स ला अवश्य भेट द्या... स्पेशल ऑफर सुरू....
रक्तदान शिबिर वरोरा

Comments