भद्रावतीत पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे रुजू व्हाॅईस ऑफ मिडियाच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट.

भद्रावतीत पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे रुजू

व्हॉईस ऑफ मिडियाच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट.

भद्रावती : येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नवे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे हे भद्रावती पोलिस स्टेशन येथे रुजु झाले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर व्हॉईस ऑफ मिडियाच्या भद्रावती तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या बैठकीत शहरातील विवीध समस्यांवर चर्चा झाली. यावेळी पत्रकारांनी त्यांना येथील विवीध समस्यांबाबत अवगत केले. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना सांगितले. बिपीन इंगळे हे यापुर्वी चंद्रपुर येथील आर्थीक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा शहरातील नागरिकांना फायदा होणार असल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था उत्तम होऊन गुन्हेगारी जगतात वचक बसेल अशी आशा शहरात व्यक्त केल्या जात आहे. सदर बैठकीत शहरातील कोलमडलेली वाहतुक व्यवस्था, गुन्हेगारी, चोऱ्यांचे वाढते प्रमाण, बेलगाम वाहतुक, रेतीतस्करी आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. यशवंत घुमे, भद्रावती तालुकाध्यक्ष सुनील बिपटे, , तालुका कार्याध्यक्ष वतन लोणे, कोषाध्यक्ष अब्बास अजाणी, सुनील पतरंगे, ईश्वर शर्मा, शंकर डे, रवि भोगे, रवि कुडदुला, रत्नाकर ठोंबरे, रवि बघेल आदी उपस्थित होते.

Comments