चालबर्डी (रै) येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे थाटात उद्घाटन

चालबर्डी (रै) येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे थाटात उद्घाटन


भद्रावती :  "ग्रामीण भागातील नागरिक अतिशय हुशार आहे. त्यांना शेतीविषयक व्यवसायाचे भरपूर प्रमाणात ज्ञान आहे. ते शिकले नाही. शाळा, महाविद्यालयात जाऊ शकले नाही म्हणून त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा भरपूर फायदा घ्या. आपल्याजवळील आणि त्यांच्याजवळील ज्ञानाची देवाणघेवाण करून, माहिती घेऊन ज्ञानसंपन्न व्हा, आदर्श नागरिक बना. असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे यांनी व्यक्त केले. ते भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै)  येथे स्थानिक विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित सात दिवसीय विशेष शिबिरात अध्यक्ष म्हणून बोलत  होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गोपाल भारती, प्रा गुलाब जोगी, जिल्हा परिषदचे माजी सदस्य यशवंत वाघ, सरपंच प्रियंका सोयाम, उपसरपंच गणेश नागपुरे, मुख्याध्यापक अनिल माथनकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ नेहारे,शाळा समितीचे अध्यक्ष हितेश बावणे,पोलिस पाटील देऊबाबा पारसे, योगेश मत्ते, ग्रामपंचायत सदस्य अमोल कोवे, मनिषा उईके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे,सहकार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश पारेलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना पोलिस निरीक्षक भारती यांनी सांगितले की, "जिथे संस्कार कमी पडतात तिथे दुष्परिणाम दिसतात. संस्कारांत वाढलेल्या लोकांना चांगले वाईट कळते त्यामुळे ते वाम मार्गाला जाण्याची शक्यता कमी असते. शिबिरातून मिळणाऱ्या संस्काराचा आयुष्यात पुढे चांगला लाभ होईल. जीवनात सतर्क रहा, सुरक्षित रहा" असे सांगितले. संस्थाध्यक्ष ॲड मोरेश्वरराव टेमुर्डे यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, संचालन डॉ.जयवंत काकडे, आभारप्रदर्शन डॉ.उत्तम घोसरे यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम अधिकाऱ्यांसह प्रा.संगिता बांबोळे,प्रा.अमोल ठाकरे,सेवक संजय तामगाडगे विशेष परिश्रम घेत आहे. यावेळी योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मते, सचिव माधव कवरासे कार्याध्यक्ष विठ्ठल मांडवकर, शिक्षक मिलींद कवाडे,प्रवीण ताजने, राजेश घोडमारे, यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिबिरार्थी, ग्रामस्थ, स्थानिक शिक्षक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments