विधानसभा प्रमुख पदी शिंदे यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात गटबाजी.

विधानसभा प्रमुख पदी शिंदे यांची नियुक्ती झाल्याने  जिल्ह्यात गटबाजी

चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात मेळावा संपन्न.

संपर्क प्रमुखांनी दूर केली शिवसैनिकाची नाराजी.

चेतन लूतडे
वरोरा 9/1/23

विधानसभा प्रमुख पदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती पक्षप्रमुखांनी केल्याने जिल्ह्यात गटबाजीचे वातावरण निर्माण झाल्याची स्थिती झाली आहे. त्यामुळे मुकेश जोवतोडे समर्थक शिवसैनिकांनी वरोरा येथे एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांची उपस्थिती होती. यावेळी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिंदे यांचे नियुक्तीमुळे नाराज शिवसैनिकानी संपर्कप्रमुखापुढे आपली व्यथा मांडली. प्रशांत कदम यांनी सुद्धा शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करत येत्या सात दिवसात विधानसभा क्षेत्रातील नाराज शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्याची हमी दिली. रविंद्र शिंदे यांची नियुक्ती करताना संपर्क प्रमुखांना विश्वासात न घेतल्याची खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मेळाव्या दरम्यान संपर्क प्रमुखांनी शिवसैनिकांना आश्वस्थ करत राजीनामे मागे घेण्याची विनंती करण्यात आली.
त्यामुळे येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात रवींद्र शिंदे गट, मुकेश जीवतोडे गट, आणि सत्तेत असणारा नितीन मत्ते गट या सर्व शिवसैनिकांची विभागणी होणार हे निश्चित आहे.
या मेळाव्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शना खाली चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मनीष जेठानी, दिनेश यादव, सुधाकर मिलमिले, नंदू पडाल, अमित निब्रड, संदीप मेश्राम, विपिन काकडे व 
या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments