पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष

पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष टिळकवार्ड,वरोरा, दि. २४ मार्च : शहरातील टिळकवार्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात फिरायला जाणारे नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी हॉटेलवरून येणाऱ्या व्यक्तींना व रहदारी करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर गेल्या रविवारी वैभव किराणा दुकानाजवळ फिरत असलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याचा दुर्दैवी अंत झाला. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून हा कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांना चावा घेत होता. पंधरा ते वीस व्यक्तींना व लहान मुलांना गंभीर जखमी केल्याने परिसरात लहान मुलांना खेळणेही अवघड झाले होते. विशेष म्हणजे या कुत्र्यांच्या शरीरावरील कातडी गळून पडल्यासारखी दिसत असून, त्यांना आजार झाले असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड असून, अशा कुत्र्यांमुळे एखाद्या लहान मुलावरही हल्ला होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, अद्यापही नगरपालिका प्रशासनान...

एकोना खदान मधून कोळसा घेऊन जाणाऱ्या अज्ञात ट्रक च्या धडकेत तरुण ठार

एकोना खदान मधून कोळसा घेऊन जाणाऱ्या  अज्ञात ट्रक च्या धडकेत तरुण ठार

लोनगाडगा येथील घटन

वरोरा तालुका प्रतिनिधी- बाळू भोयर 
 वरोरा ते  माढळी रोड दरम्यान लोनगाडगा येथील तरुण    राजू बाबाराव दारुंडे  वय वर्ष 45  हा   सकाळी  6 वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना माढेळी कडून एकोणा माईंस कडे जाणाऱ्या  भरदार वेगवान  ट्रकने त्याला उडवले व त्याचा  त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना  आज सकाळी 6 वाजता  घडली.
      सकाळी तो त्याची पत्नी दोघेही घरून  सकाळी फिरायला गेले होते. मागून येणाऱ्या ट्रक चा अपघात झाला त्याच दरम्यान एक मोटरसायकलस्वार त्याच दरम्यान ट्रक च्या प्रकाशाने डोळे दिपल्याने त्याचा सुद्धा अपघात होऊन  मृतकाच्या बाजूला पडला  असल्याचे समजते.
 लोनगाडगा वंधली पांझुर्णी या गावातील लोकांनी त्वरित ट्रक बंद करण्यात यावे अन्यथा  रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.  
अपघातानंतर उपजिल्हा रुघणालायत नेण्यात आले व त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. 
वेकोलीने कोळसा वाहतुकीसाठी रोडचे नियोजन न केल्यामुळे वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्यामुळे वारंवार स्थानिक समस्या वाढत असल्याचे चित्र या भागात दिसत आहे.




Comments