गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

मे.अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी जमिनीचा भाव ठरवितांना ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्या.सरपंच प्रदीप महाकुलकर यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी

मे.अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर  कंपनीशी जमिनीचा भाव ठरवितांना ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्या.

सरपंच प्रदीप महाकुलकर यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी

भद्रावती: तालुक्यातील टाकळी,जेना व बेलोरा याठिकाणी मे. अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड द्वारा खुल्या व भूमिगत कोळसा खाणीसाठी शेतजमिनी संपादित करतांना व जमिनीचा भाव ठरवितांना गावातील ग्रामस्थांना व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे आदेश कंपनीला देण्यात यावे.या आशयाचे निवेदन पानवडाळा ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
      मे. अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड द्वारा टाकळी,जेना व बेलोरा खुल्या व भूमिगत कोळसा खणीसाठी लागणारी ९३६ हे.आर.जमिनी करिता झालेल्या पर्यावरण जनसुनावणी मध्ये कंपनीने ठरविल्याप्रमाणे एकाचवेळी संपादित करण्यात यावी.आणि शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमिनीचे दर निश्चित करण्यात यावे.याकरिता स्थानिक व कंपनी प्रशासनाने थेट प्रकल्पग्रस्त व ग्रामपंचायतशी चर्चा कण्याचे आदेश देण्यात यावे.आत्तापवेतो मा.मुख्यमंत्री म. रा.मुंबई,मा.केंद्रीय कोळसा मंत्री,भारत सरकार ,नवी दिल्ली,मा.जिल्हाधिकारी,चंद्रपूर, स्थानिक व कंपनी प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊन देखील कोणतीही दखल घेतली गेली नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे जमिनीचे दर ठरविताना सदरील प्रकल्पात येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चर्चेकरिता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावे.परिणामी उद्भवणाऱ्या परिस्थितीस स्थानिक व कंपनी प्रशासन जबाबदार राहील.अशा आशयाचे मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पानवडाळाचे  सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

Comments