आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी शिबीराचे उत्तम माध्यम**खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन*

*आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी शिबीराचे उत्तम माध्यम*


*खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन*

चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत आरोग्याच्या सोइ, सुविधा पोहचण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील प्रत्येक माणसाला आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी  शिबीराचे उत्तम माध्यम असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. 
आज आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खांबाडा येथे सेवा सप्ताह व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी खासदार बाळू धानोरकर बोलत होते. 

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, डॉ. मुजनकर, सरपंच प्रकाश शेळकी, डॉ. शालिक झाडे, पोलीस पाटील शेळकी, रत्नाताई अहिरकर, विलास गावंडे, गणेश मडावी, संजय बोबडे, पद्माकर कडूकर, डॉ. रोहन, सुनील गेडाम, चौधरी, नलिनी धोटे, अविनाश बन, प्रकाश कडुकर, अनिरुद्ध देठे, सुरज बावणे, दिवाकर निखाडे यांची उपस्थिती होती.      

त्यासोबतच विविध आजार, आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देणे, संसर्गजन्य व असर्गजन्य आजारांची माहिती व उपाययोजना इत्यादी कार्यक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. 

खांबाडा येथे ग्रामीण रुग्णालय, वरोरा यांनी आरोग्य शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषोधोपचार केला. उदघाटन प्रसंगी आयोजित आरोग्य शिबिराला परिसरातील ग्रामस्थांनी मोठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून निदान करून घेतले.

Comments