क्रीडा संकुल क्रिकेट क्लब ठरले सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेते

क्रीडा संकुल क्रिकेट क्लब ठरले सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेते 

पस्तीस वर्षे वयोगटातील स्पर्धा

वरोरा : 
चेतन लूतडे

बाळासाहेबांची शिवसेना च्या वतीने आयोजित मुख्यमंत्री चषक लीग क्रिकेट स्पर्धेत
क्रीडा संकुल क्रिकेट क्लबने प्रथम पारितोषिक पटकावले.
आज सकाळी झालेल्या१२ षटकाच्या सामनामध्ये क्रीडा संकुल विरुद्ध डॉक्टर असोसिएशन अशी सरळ लढत पाहायला मिळाली. यामध्ये डॉक्टर संघाने प्रथम फलंदाजी करत 97 धावा गोळा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी क्रीडा संकुल तर्फे एडवोकेट राजू हेपट यांनी उत्कृष्ट खेळी खेळत आपल्या सामन्याला विजयी पथावर नेले. 
यावेळी  28 धावा  करून मॅन ऑफ द मॅच  चे मानकरी ठरले. यावेळी संघाचे कॅप्टन डॉक्टर अमोल हजारे यांनी शारीरिक फिटनेस विषयी महत्त्व विशद केले.
तर डॉक्टर असोसिएशन चे कॅप्टन डॉक्टर हेमंत खापणे यांनी आयोजन समितीचे आभार व्यक्त करून डॉक्टर जर फिट असेल तर समाज नक्कीच फिट राहणार असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

सामना पाहण्यासाठी वरोरा शहरातील क्रिकेट प्रेमींची गर्दी यावेळी आनंद निकेतन कॉलेज मैदानात पाहायला मिळाली. 
मुख्यमंत्री चषका दरम्यान विविध पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मृणाल काळे, प्रमुख पाहुणे देशपांडे सर, बाळासाहेबाची शिवसेनाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, गोपाल वरुडकर सर, हरि नारायण पोटे, योगिता लांडगे, समीर बारई , तानाजी बायस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी  एडवोकेट राजू हेपट मॅन ऑफ द मॅच
डॉक्टर हेमंत खापणे मॅन ऑफ द सिरीज
डॉक्टर नितीन पाटील बेस्ट बॅट्समन
विनोद फनसे बेस्ट बोलर
राजू जाजुर्ले बेस्ट विकेट किपर
डॉक्टर जगदीश वैद्य बेस्ट कोच
डॉक्टर राकेश पिंपळकर बेस्ट फिल्डर

म्हणून पुरस्कार वितरित करण्यात आले.

ही स्पर्धा 35 वर्षे वरील वयोगटातील असल्याने या क्रिकेट स्पर्धेची वरोरा शहरात चर्चा होत असून वरोरा शहरातील क्रिकेटपटूंची तरुणाई यावेळेस पाहायला मिळाली.

जाहिरात..

Comments