सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक संघाची मजबूत पकड

सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक संघाची मजबूत पकड 
*सलग दोन सामने जिंकल्याने चुरस वाढली

वरोरा : बाळासाहेबांची शिवसेना च्या वतीने आयोजित मुख्यमंत्री चषक लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी झालेल्या चार सामन्यात मॉर्निंग वॉक ग्रुप  संघाने प्रथम लोकमान्य शिक्षक संघाचा आणि नंतर ग्रामसेवक जिल्हा संघाचा पराभव करीत स्पर्धेत मजबूत पकड निर्माण करून उपांत्य फेरीत पोहचण्याचा मार्ग प्रशस्त केला. दोन्ही सामन्यात उत्तम खेळी करून चैतन्य लुतडे हे मॉर्निंग वॉक संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
  बाळासाहेबांची शिवसेना चे चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी दि २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक प्रोफेशनल लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आठ संघातील दोन गटात ही स्पर्धा होत आहे. आज २२ जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी पहिला सामना मॉर्निंग वॉक ग्रुप आनंदवन विरुद्ध लोकमान्य शिक्षक संघ वरोरा यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मॉर्निंग वॉक ग्रुप संघाने १० षटकात  सहा गड्यांच्या मोबदल्यात ८९ धावा केल्या. सदर आव्हान घेऊन मैदानात उतरलेला लोकमान्य शिक्षक संघ १० षटकात आठ गडी गमावून ७४ रन पर्यंतच मजल मारू शकला. या लढतीत मॉर्निंग ग्रुपच्या चैतन्य लूतडे यांनी ५९ धावा काढुन लोकमान्य संघाचे तीन गडी बाद केले. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दोन खेळाडूंना धावचित केले.त्यांना मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. 
दुसऱ्या लढतीत आनंद निकेतन महाविद्यालय संघ वरोरा ने गांधी उद्यान योग समिती वरोराचा पराभव केला. आनंद निकेतन महाविद्यालय संघाने दहा षटकात चार गडी गमावून १२० धावा काढल्या. तर त्याला प्रतिउत्तर देत  गांधी उद्यान योग समिती संघ केवळ १०० धावांपर्यंत पर्यंतच मजल मारू शकला. गांधी उद्यानच्या अक्षयने एकाकी झुंज देत ४२ धावा केल्या परंतु त्याचीही खेळी व्यर्थ ठरली. ३५ धावा काढणाऱ्या आनंद निकेतन महाविद्यालय संघाच्या सूर्यवंशी यांना मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. तिसऱ्या सामन्यात मॉर्निंग वॉक आनंदवन संघाने ग्रामसेवक संघाचा पराभव करून विजय मिळवला.या लढतीत मॉर्निंग वॉक संघाने  प्रथम फलंदाजी करतांना १० षटकात ११६ धावा काढल्या. हे आवाहन घेऊन उतरलेल्या ग्रामसेवक संघाने १० षटकात आठ गडी गमावून केवळ ७७ धवांपर्यंत मजल मारली. या लढतीत मॉर्निंग वॉक संघाच्या चैतन्य लुतडे यांनी ६७ धावा केल्या तसेच त्यांनी रुपेश जाजुर्ले यांच्यासोबत ९७ धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली.  मॉर्निंग वॉक ग्रुपच्या बबलू पावडे यांनी उत्कृष्ट बिलिंग करून ग्रामसेवक संघाचे चार गडी गडी बाद केले आणि मॉर्निंग वॉक ग्रुप संघच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या लढतीत ६७ धावा करणाऱ्या चैतन्य लुतडे यांना मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. सदर स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांचे दोन संघ खेळण्यात आले .आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना च्या चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख योगिता लांडगे यांच्या महिला आघाडी संघ विरुद्ध आनंदनिकेतन महाविद्यालय महिला संघ समोरासमोर उभा टाकले. यात आनंद निकेतन महिलांच्या संघाने शिवसेना महिला आघाडी संघाचा पराभव केला. आज झालेल्या लढतीमध्ये अ गटात मॉर्निंग वॉक ग्रुप आनंदवन ने सलग दोन्ही विजय मिळववून  स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.

Comments