वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

भद्रावती येथे व्हाईस ऑफ मीडिया ची तालुका कार्यकारणी गठित

भद्रावती येथे व्हाईस ऑफ मीडिया ची तालुका कार्यकारणी गठित
अध्यक्षपदी सुनील बिपटे तर सरचिटणीस पदी जावेद शेख.
भद्रावती : स्थानिक वरद विनायक गणेश मंदिर परिसरात एका बैठकीदरम्यान  देशात अग्रगण्य पत्रकाराची संघटना असलेल्या व्हाॅईस ऑफ मीडिया ची भद्रावती तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मिडिया चे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. यशवंत घुमे होते. यावेळी तालुका कार्यकारणी त सर्वानुमते अध्यक्ष - सुनील बिपटे, उपाध्यक्ष- सुनील पतरंगे, कार्याध्यक्ष- वतन लोणे सरचिटणीस- जावेद शेख, सहसचिव - रवी भोगे, कोषाध्यक्ष - अब्बास अजानी, कार्यवाहक - ईश्वर शर्मा, संघटक - संदीप झाडे, प्रसिद्धीप्रमुख- रवी बघेल, सदस्य सर्वश्री शंकर डे, रवी करदुल्ला, रत्नाकर ठोंबरे इत्यादींचा समावेश आहे. सदर कार्यकारणी कार्यकारणी ही दोन वर्षासाठी आहे .नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments