सध्या कबड्डीचा सुवर्णकाळ: देवराव भोंगळे**स्व. संजय देवतळे स्मृती कबड्डी सामन्याचे थाटात उद्घाटन*

*सध्या कबड्डीचा सुवर्णकाळ: देवराव भोंगळे*

*स्व. संजय देवतळे स्मृती कबड्डी सामन्याचे थाटात उद्घाटन*

वरोडा : श्याम ठेंगडी, वरोरा 



कबड्डी हा क्रिडा प्रकार पूर्वापार चालत आला असला तरी आता कबड्डीचा सुवर्णकाळचं आहे. प्रो कबड्डी सारख्या नव्या दमाच्या स्पर्धा असोत किंवा मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील खेलो इंडिया सारख्या वैशिष्ट्यपूर्ण क्रिडा स्पर्धांचे आयोजन असो यासारख्या स्पर्धांच्या माध्यमातून युवा पिढीला व पर्यायाने भारताला सशक्त करण्यासाठी हातभार लागतो आहे. कबड्डी सारख्या सांघिक खेळामध्ये अनेक कौशल्यांचे दर्शन घडते. केवळ खेळाडूच नाही तर प्रेक्षकही श्वास रोखून संपूर्ण वेळ खेळात रममाण होतात असा हा एकमेव खेळ आहे. त्यामुळे अशा स्पर्धांचे नियमित आयोजन होणे गरजेचे आहे. तरुणांनीही अशा सांघिक उपक्रमांत अधिकाधिक संख्येने सहभाग दर्शविला पाहिजे.
क्रीडा स्पर्धांमुळे आपल्याला आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी शक्ती मिळते, सर्वांगीण विकासाला चालना मिळण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना या माध्यमातून चांगल्या संधी सुद्धा प्राप्त होतात. असे प्रतिपादन १४ जानेवारी रोज शनिवारला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवरावजी  भोंगळे यांनी वरोडा येथे केले.
      भाजपचे दिवंगत नेते व माजी मंत्री संजय देवतळे स्मृतीप्रित्यर्थ वरोडा भारतीय जनता युवा मोर्चा व श्री हनुमान व्यायाम शाळेच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ जानेवारीपर्यत आयोजित पुरुषांच्या खुल्या कबड्डी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते . येथील हनुमान व्यायाम शाळेच्या हे सामने खेळले जाणार आहेत.
          देवरावजी भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सामन्याचे उद्घाटन श्वेताताई संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. 
       यावेळी भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे,जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले, जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे ,विजय राऊत यांचेसह अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
         येथील श्री हनुमान व्यायाम शाळेच्या मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेसाठी विविध ठिकाणाहून आलेल्या कबड्डी संघाना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 


प्रसंगीच, याठिकाणी अनेक ठिकाणांहून आलेल्या नावाजलेल्या कबड्डी संघांना भेटून त्या सर्वांना उत्तम क्रिडाप्रदर्शनासह विजयासाठी शुभेच्छा ही दिल्या.

Comments