मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल"

"मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल" चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर प्रसिद्ध 'मामा मेल' या वाघाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. भर दिवसा या वाघाने महामार्गावरून एका गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हा धक्कादायक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत. 'मामा मेल' या वाघाचा अधिवास मूल-चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात आहे. काल आगडी भागात महामार्गाच्या बाजूला त्याने गायीची शिकार केली आणि तिच्यावर ताव मारला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी तेथे गर्दी केल्याने 'मामा मेल'ने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत नेली. या थरारक शिकारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

गोंडवाना विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या सदस्यांच्याची नावे वगळण्यात आली.


गोंडवाना विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या सदस्यांच्याची नावे वगळण्यात आली.

चेतन लूतडे
वरोरा ११/जानेवारी/२३

 गोंडवाना विद्यापीठात सहा जानेवारी २०२३ रोजी श्री. संतोष कुमार मुख्य सचिव, राजभवन यांनी गोंडवाना विद्यापाठीचे प्र- कुलगुरु प्रशांत बोकारे यांच्या नावे नऊ सिनेट सदस्यांची यादी पाठविली आहे.  या यादीत ठराविक पक्षाचे समर्थक, सदस्य यांना स्थान देण्यात आले. परंतु बाळासाहेबांची शिवेसना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी काही सदस्यांची नावे दिली होती. परंतु जाणीवपूर्वक दबावाखाली ही नावे वगळण्यात आल्याची तक्रार केली आहे. पक्षविस्तार करीता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ही नावे या यादीत समाविष्ट होणे गरजेचे होते. परंतु ही जाणीवपूर्वक डावलल्यामुळे आपल्या पक्षाला आदिवासी बहुल क्षेत्रात विस्तार करताना भविष्यात अडचणी येणार आहे. तरी अद्याप महामहिप राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अंतिम स्वाक्षरी या यादीवर झालेली नाही. त्यामुळे आपण मध्यस्थी करुन या यादीत आपल्या पक्षाने सुचविलेली नावे समाविष्ट करुन न्याय देण्याची विनंती पत्रातून केली आहे.

Comments