रवींद्र शिंदे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख पदी

रवींद्र शिंदे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली रवींद्र शिंदे यांच्या कार्याची दखल

विधानसभा क्षेत्राची सर्वांगीण जवाबदारी

वरोरा : 
         राज्यात मागील काही महिण्यापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामान्य शिवसैनिक मात्र कमालीचा सक्रिय झाला असून शिवसेनेशी प्रामाणिक असलेले सैनिक पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. 
          पक्षश्रेष्ठींचे दौरे, यात्रा, जाहीर कार्यक्रम यातून शिवसेना ढवळून निघाली आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या विधानसभाप्रमुख पदावर मागील काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांची नेमणूक झाली आहे. यात विशेष असे की, या जवाबदारीत वरोरा व भद्रावती मिळून असलेल्या विधानसभा क्षेत्राचे सर्वांगीण अधिकार एकवटले आहेत. यात पक्ष संघटन, नियुक्त्या, निवडणुका आदी सर्वंकष अधिकार हे शिंदे यांना असणार आहेत.
               प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र शिंदे यांना बोलावून घेतले. कोरोणा प्रादुर्भावाच्या काळातील व त्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, लघु व्यावसायिक, आत्महत्याग्रस्त, पूरग्रस्त, यांच्यासाठी केलेले मदतकार्य, आदी त्यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्याचे आवाहन केले.  पक्षश्रेष्ठींची शिंदे यांच्या कार्यावर नजर होती.
        यापूर्वीच रवींद्र शिंदे यांना पक्षाकडून जवाबदारी मिळणार होती. जिल्ह्यातील पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे मात्र आता इतर पक्षात असलेल्यांनी राजकारण केले व शिंदे यांना पदापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचले. मात्र शिंदे या सर्वांना पुरून उरले व त्यांना शेवटी विधानसभेची जवाबदारी देण्यात आली.
                  रवींद्र शिंदे हे पूर्वाश्रमीचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. याच बँकेचे वर्तमान संचालक आहेत.  कोरोणाबाधीतांवर मोफत उपचार केले. त्यानंतर त्यांनी गावागावात जावून गरीब व गरजूना सतत मदतकार्य राबविले. दीव्यांगाना सायकल वाटप सुरु आहे. अनेक निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेतले. विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकेसाठी मदत केली. लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत केली. पूरग्रस्तांकरीता धावून आले. विविध क्षेत्रात जावून ट्रस्ट तर्फे त्यांचे मदत कार्य सुरूच आहे. या सर्वांची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या कडे विधानसभाप्रमुख पदाची जवाबदारी दिली आहे.
          या वेळी रवींद्र शिंदे यांचेशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की समाजकारणातून राजकारण हे आपले ब्रीद राहणार आहे. आधी जनसेवा व नंतर राजकारण हा पायंडा आपण जिल्ह्यात घालू. शिवसेना ही ८०% समाजकारण व २०% राजकारण करणारा पक्ष आहे. शिवसेनेनी अनेकांना मोठे केले मात्र अनेक जण मोठे झाल्यावर सेनेला सोडून गेले, हा या जिल्ह्याचाच नव्हे तर राज्याचा इतिहास राहीला आहे. शिवसेना हा घराणेशाही किंवा भांडवलशाही जपणारा पक्ष नसून सामान्य घरातील युवकांना नेता बनविण्याचे कार्य या पक्षाने सदोदित केले आहे. याचाच फायदा पुढेही पक्षाला होईल व सामान्य जनता सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहील. 
            शिवसेनेचे हिंदुत्व हे बहुजनांना सामावून घेणारे आहे. ते सत्तेसाठी लाचार नाही. काही विशिष्ट लोक म्हणजे हिंदुत्व हे समीकरण शिवसेना मानत नाही. आम्ही युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, जुनेजाणते तथा नवीन पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेवून सर्वसमावेशक असे काम करू असेही रवींद्र शिंदे म्हणाले.
           

यावेळी रवींद्र शिंदे यांना पक्षाकडून जवाबदारी मिळाली असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या ट्रस्टच्या कार्याबद्दल विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविन्द्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर या सामाजिक संस्थेचे कार्य हे आजतागायत जसे सुरू होते तसेच पुढेही सुरू राहील. ही संस्था राजकीय क्षेत्रापासून सदैव अलिप्त असेल. राजकारण व समाजकारण यात मिश्रण होणार नाही. ट्रस्टचे कार्य केवळ सामाजिक असेल व ते राजकारणापासून दूर राहील. यासाठी उच्चविद्याविभूषित सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले यांचे कडे ट्रस्टच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आस्वले सर हे निष्पक्ष होवून ट्रस्टचे कार्य अविरत सुरू ठेवतील.Comments