नवीन वर्षाची सुरुवात अवैध रेती तस्करी करणाऱ्या टोळीचा ठरला कर्दनकाळ.

नवीन वर्षाची सुरुवात अवैध रेती तस्करी करणाऱ्या  टोळीचा ठरला कर्दनकाळ.

वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांचा वाळू तस्करी करणाऱ्या टोळी ला लगाम

वर्धा नदीचे नैसर्गिक स्त्रोत पात्र वळवून अवैध रेती तस्करी करीत होते.



चेतन लूतडे वरोरा  ३१/१२/२०२२

दिनांक ३१/१२/२०२२ रोजी दुपारी १३.०० वा चे दरम्यान श्री. आयुश नोपानी सा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार  करजी रेती घाटावर वर्धा नदीच्या पात्रात अवैधरित्या पोकलॅन्ड द्वारे रेतीचा वर्धा नदीपात्रातुन उपसा होत असून चोरट्या मार्गाने रेतीचे वाहतुक केली जाते. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यानी सदर ठिकाणी छापा मारून कारवाईचे आदेश दिले.

 मा. श्री. आयुष नोपानी सा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक श्री. दिपक खोब्रागडे, पोहवा / २८८ मुनेश्वर, पोहवा / १००० दादाजी, पोहवा २२४४ दिलीप नापोशि/ १२२८ नितीन पोशि/ २९१२ सचिन, पोशि/ १३३० सुशांत यावेळी  हजर होते.  पंचाना बोलावून घेवून सदर घटनेबाबत थोडक्यात हकीकत समजावून सांगुन पंच समक्ष सोबत घेण्यात आले.

 श्री. आयुष नोपानी सा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या पथकासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून १६.३० वा. करजी रेती घाटावर गेलो असता वर्धा नदीचे पात्रात सहा हायवा ट्रक उभे व दोन पोकलॅन्ड नदी पात्रातून रेती उपसा करताना दिसुन आले. तसेच रेती घाट मालकाने नदी पात्रात रेती व मुरूम याचा छोटा बंधारा बांधुन नैसर्गीक नदी प्रवाह खंडीत करून प्रवाहाची दिशा बदलवीली नदी पात्रात उभे असलेले ट्रकांत भरलेली रेती आम्हा पोलीसांना पाहाताच वाहनामध्ये असलेली रेती जागीच नदी पात्रात खाली केली व तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्या मध्ये काही हायवा ट्रक हे जागीच मिळुन आल्याने पो स्टाफचे मदतीने पकडण्यात आले. तसेच पोकलॅन्ड ऑपरेटर चालकांना रेती पोकलँन्डद्वारे उत्खननाबाबत काही कागदपत्रे असतील तर ती आम्हांस दाखवा असे म्हणालो असता त्यांनी आम्हांस सांगीतले की आमच्या कडे शासना कडुन अशा प्रकारे उत्खनाबाबत कुठलाही परवाना आदेश नाही. आम्ही या ठिकाणावरून रेती घाट मालक प्रविण पागी, कासीफ खान, यांचे सांगण्यावरून रेती पोकलॅन्डद्वारे उत्खननाचे काम करीत आहोत असे सांगीतले. त्यानंतर आम्ही वर्धा नदीचे पात्रात वाहत्या पाण्यामध्ये दगड गोटे, रेती व मुरूम च्या सहायाने नदी पात्रात बंधारा बांधुन नदी पात्राची रेती वाहून नेण्यासाठी प्रवाह बंद केला. त्यामुळे नदीच्या नैसर्गीक प्रवाहास अडथळा निर्माण केला, तसेच रेती मुरूमाचा बंधारा बांधुन प्रवाह बंद केला व पाणी पिण्या योग्य असलेले दुषीत करण्यास कारणीभूत झाले तसेच अवैधपणे पाण्याचे प्रवाहात बदल करून प्रमाणा बाहेर रेतीचे उत्खननाची अवैध्य कृती केली. शेतीसाठी व पिण्याचे पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असून सुद्धा अवैध रेती उत्खननाची कृती केली व पर्यावरणाचा हास केला. मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाची अवहेलना करून पोकलॅन्डचे मदतीने व हायवा चे सहायाने अवैध रेती उत्खनन करून जिल्हाधिकारी यांचे आदेशाची अवहेलना केली. जप्त केलेल्या हायवा व पोकलॅन्ड चे वर्णन

पुढील प्रमाणे सांगीतले. १) किंमत रु. २५ लाख TATA 1318 MH 34 A8 9872 चा चालक सुरज प्रकाश टोंगे वय २३ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. कासमपंजा वार्ड वरोरा

२) किंमत रु. १० लाख TATA 1616 MH 34 AB 4356 चा चालक रोशन अनंता दाते, वय २५ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा भटाळा पो.स्टे. शेगाव,

३) किंमत रु. २० लाख TATA 2518 MH 40 BG 2475 चा चालक राजेश रामकृष्ण उके, वय २७ वर्ष, घंटा

डायकर, रा वर्षा पुलफैल वर्षा ४) किंमत रू. २० लाख TATA 2518 MH 34 AV 2353 चा चालक संदीप बालाजी कुबडे, वय ४२ वर्षे

चंदा ड्रायव्हर, रा. घोडदरा ता मारेगाव जिल्हा यवतमाळ:

14) किंमत रु. २० लाख TATA 2518 MH 40 AK 1212 चा चालक प्रशांत मारूती कोल्हे, वय ४२ वर्षे. धंदा ड्रायकर, सुभाष वार्ड हनुमान आखाडा वरोरा क) किंमत रु. २५ लाख TATA 3118 MH 27 BX 1199 या चालक आशिष दिलीप लावट वय २६ व

धंदा ड्रायव्हर, रा. पेंदुर ता वणी पोस्ट मुकनेगाव जिल्हा यवतमाळ ७) पीसी २२० पोकलॅंड किंमत रु ४० लाख चालक रवि प्रलाद वाघमारे, अन्य २६ वर्षे, रा. गोधनी ता. जि. यवतमाळ

(८) पीसो २२५ पोकलॅन्ड HITACHI किंमत रु ४५ लाख चा चालक विवेक कजी राऊत, वय २९ वर्ग में

वरील वर्णनाचा मुद्देमाल एकुण किंमत रु २,७५,००,००० (दोन कोटी पाच लाख) आम्ही सपोनि निलेश चवरे यांनी दोन पंचासमक्ष १८.४० वा जप्त केला वरील मुद्देमालाचे चालक व रेती घाट मालक यांनी अवैध्य पोकलॅन्डचा वापर करून मा जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे आदेशाचे उल्लंघन करून वर्धा नदीचे पात्रातुन जाणीव पुर्वक स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता उत्खनन करून रेती चोरीचा प्रयत्न केला. तसेच वर्धा नदीचे पात्रात रेती, दगड गोटे मुरुमाचे सहायाने पात्रात आगळीक केली. तसेच नदीचे पात्र दुषीत करून जे पाणी पिण्यायोग्य आहे ते दुषीत करण्यास कारणीभूत झाले तसेच गैरपणे पाण्याचे दिशेत बदल करून पोकलॅन्ड व हायवाने प्रमाणाबाहेर रेतीचे अवैध उत्खनन करून शेती मध्ये व पिण्याचे पाण्यामध्ये पट होईल याची त्यांना जाणीव असताना सुद्धा तशी कृती केली. अशा प्रकारे कृती करून नदीच्या निचरा प्रक्रीयेस ती पोहचविली. सदर प्रकार हा रेती घाट मालक १) प्रदिप घागी २) काशीफ खान यांचे संगणमताने केला असल्याचे वर नमुद चालक सांगत असल्याने चोरटी वाहतुक करण्याचे उद्देशाने वर्धा नदीचे पात्रात आले म्हणून  घाट मालक, चालक यांचे विरुद्ध कलम ३७९.५११.४३०, ४३१.१०९.१८८.३४ भा.द.वि. सह कलम ४८(७) (८) म.ज.म अधिनियम १९६६ अन्वये माझी कायदेशिर फिर्याद करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष निपाणी


वरील कारवाईने अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून. रेतीचे घाट शासनाकडून विकत घेऊन लवकरात लवकर पैसा कमावण्याच्या नादात वर्धा नदीचे नैसर्गिक स्रोत सुद्धा वळवण्यात आले आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी नोपानी यांच्या कारवाईने वाळू तस्करी करणाऱ्या टोळीना जबर झटका लागला आहे.

Comments