वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

सहाय्यक लेखा अधिकारी लासलुचपत विभागाच्या जाळ्यात , 2500 रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक

सहाय्यक लेखा अधिकारी लासलुचपत विभागाच्या जाळ्यात

2500 रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक


चेतन लूतडे 5/1/2023
वरोरा 

आनदं गुरूदास कांबळे, सहाय्यक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा, ता. वरोरा जि. चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक करण्यात आली.

तक्रारदार हे मौजा वरोरा येथील रहीवासी असून तक्रारदार हे दिनांक ३१/०५/२०२२ रोजी पंचायत समिती वरोरा अंर्तगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथून आरोग्य सहायक या पदावरून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले होते. तरी तक्रारदार यांचे अर्जित रजेचे सममूल्य रक्कम ६,५६,६००/- रूपये चे बिल काढुन देण्याचे कामाकरीता आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपुर यांनी तक्रारदारास ४,०००/- रुपये ची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांना लाच म्हणून ४०००/- रु. देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्यांचेविरुद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०४/०१/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांनी ४०००/-रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती २,५००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज दिनांक ०५/०१/२०२३ रोजी पंचायत समिती वरोरा येथे पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांना २,५००/- रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही श्री राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदेकर पो. अं राकेश जांभुळकर, मपोकों पुष्पा काचोळे व चालक पो अं. सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लावेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर फोनक. ०७१७२-२५०२५१

टोल फ्री नंबर- १०६४

श्री. अविनाश भामरे, पोलीस उप अधीक्षक-- ८८८८८२४५९९ श्री. जितेंद्र गुरनले, पोलीस निरीक्षक- ८८८८८५७१८४

Website www.acbmaharashtragov in

(जितेन्द्र गुरनुले) पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्यूरो, चंद्रपूर

Comments