कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 123 वी जयंती साजरीबेलदार समाजाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 123 वी जयंती साजरी
बेलदार समाजाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला

वरोरा
चेतन लूतडे

स्व. मा.सा.उपाख्य कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री व दूसरे मुख्यमंत्री यांचे १२३ वी जयंतीचे औचित्य साधून व मकर संक्रांत निमित्त बेलदार समाज वरोराचे वतीने आशिर्वाद मंगल कार्यालय, वरोरा येथे सामूहिक स्नेहमीलन सोहळा पार पडला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्रीमती विद्याताई दागमवार,से.नि. शिक्षिका, न.प.वरोरा, तथा महिला अध्यक्ष, बेलदार समाज, संघटना वरोरा, कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉ. श्रीकांत बि.अमरशेट्टीवार, प्रभारी अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, कापुस उत्कृष्टता, एकार्जुना, वरोरा प्रमुख मार्गदर्शक श्री.अरविंद ताटेवार, केंद्र प्रमुख, पं.स. मारेगाव, डॉ.निकिता गिंदेवार, (दासरवार) स्त्री रोग तज्ञ, प्रमुख अतिथि श्री.दिलीप न. गिदेवार, प्रशासन अधिकारी (शिक्षण) तथा मुख्याध्यापक,न.प. वरोरा, शहर अध्यक्ष, बेलदार समाज संघटना,  डॉ.अजय गिंदेवार, एम.एस.(जनरल सर्जरी) आणि संतोष गुंतीवार, तालुका अध्यक्ष, बेलदार समाज संघटना हे उपस्थित होते,  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करून  प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले, त्यानंतर सन २०२१ ते २२ या कालावधीतील दिवंगत झालेल्या समाज बांधवाना सामूहिक श्रद्धांजलि देण्यात  आली. पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले.
अमृत महोत्सवी वर्षा निमित्त  ७५ वर्षाच्या वरिल एकून १४ जेष्ठ नागरिकांचा सत्कार, ७ सेवा निवृत्त समाज बाधवांचा सत्कार करण्यात आला.  त्यानंतर प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी सत्कार अंतर्गत एकुन १४ विद्यार्थ्यांचा सम्मान चिन्ह व प्रमाणपत्रासह पुष्प देवुन गौरव करण्यात आला, महिलांचे व लहान मुलांचे सांकृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यामधे रांगोली स्पर्धा, एकल नृत्य, सामूहिक नृत्य, फैशन शो, इ.. कार्यक्रम घेण्यात आले त्यात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणप्रत्र देन्यात आले . कार्यक्रमाचे निमित्ताने आरोग्य तपासणी शिबीर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख अतिथि व मार्गदर्शक डॉ.निकिता गिंदेवार(दासरवार) व डॉ.अजय गिंदेवार यांनी मार्गदर्शन केले. यांचे सोबत डॉ.ऐश्वर्या जीलगिलवार(गोर्लावार), पांडुरंग कोमरेड्डीवार, जयश्री जीलगीलवार , भाग्यश्री राजू फेथफुलवार,अंकुश पा.कोमरेड्डीवार यांनी सहकार्याने राबविन्यात आला व वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यानी उपलब्ध करून दिलेल्या तात्रिक साहित्यामूलेच शक्य झाले असुन त्यात जवळपास १५० पेक्षा जास्त समाजबांधवांनी लाभ घेतला.  कार्यक्रमाचे संयुक्त संचालन विलास पारेलवार ,संगीता अडेवार व  कीर्ति फेथफुलवार यांनी केले. प्रास्ताविक श्री.दिलीप गिदेवार, शहर अध्यक्ष यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.संतोष गुंतीवार, तालुका अध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटनेच्या प्रमुख पुरुष पदाधिकारी सर्वश्री.संजय जिलगीलवार, राजू फेथफुलवार, शंकर पारेलवार, अजय बालमवार, अशोक बोमरतवार, राहुल दागमवार, अमोल ताटेवार, संजय गुंतीवार, अजय वदनलवार, राजू जिलगीलवार,प्रज्वल कोलतेवार, मनोज मदकुंटावार,दीपक पारेलवार, मनोज पोगुलवार, समीर पुंजरवार, सचिन बोमरतवार, नितिन देबटवार, श्रीकांत ताटेवार, गजानन वदनलवार., सर्व महिला पदाधिकारी  सौ.दीपा पारेलवार, मनीषा गिदेवार,स्मिता ताटेवार, प्रियंका जिलगिलवार, सरिता पारेलवार, वैशाली गिदेवार, मंजूषा बालमवार, अंजली पारेलवार, रश्मि गुंतीवार, प्रीति सुंकरवार, सरिता पुंजरवार, प्रतीक्षा कोलतेवार, तेजस्वी कोलतेवार, अश्विनी कोलतेवार, राधा वदनलवार, श्यामलता पोगुलवार तसेच सर्व समाज बांधवानी अथक परिश्रम घेतले .
सदर कार्यक्रमात सर्व समाज बांधव सहपरिवार सहकुटुंब बहुसख्येनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला, कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी यांचा सत्काराकारिता देण्यात  आलेले सन्मान चिन्ह स्व.शरद जंगीलवार, यांचे स्मृति प्रीत्यर्थ श्रीमती जोत्सनाताई श. जंगीलवार, यांचेकडून प्राप्त झाले तसेच प्रमुख अथिति व उद्घाटक यांना देण्यात  आलेले स्मृतीचिन्ह श्री.अशोक गिदेवार यांचेकडून स्व.लीलाबाई न. गिदेवार, यांचे स्मृतीप्रीत्यर्थ प्राप्त झाले. त्यानंतर स्नेहभोजनानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments