ज्येष्ठ शिवसैनिक व नवनियुक्त पदाधिकारी सत्कार कार्यक्रमात अनेकांचा शिवसेना प्रवेश *भाजपा नगरसेविकेच्या पतीचा समावेश

ज्येष्ठ शिवसैनिक व नवनियुक्त पदाधिकारी सत्कार कार्यक्रमात अनेकांचा शिवसेना प्रवेश 
*भाजपा नगरसेविकेच्या पतीचा समावेश

वरोरा : भद्रावती आणि वरोरा तालुका शिवसेनेतर्फे स्थानिक नगर भवन मध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा तसेच नवनियुक्त शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वरोरा- भद्रावती शहर व तालुका परिसरातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यात वरोरा येथील भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीचा देखील समावेश आहे. भाजपाचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील एखाद्या नगरसेविकेच्या पतीने शिवसेना प्रवेश घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वरोरा येथील नगर भवन मध्ये ज्येष्ठ शिवसैनिक तसेच नवनियुक्त शिवसेना पदाधिकारी आणि युवासेना पदाधिकारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम बुधवार दि.७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. शिवसेनापक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार  पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाश वाघ यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून युवासेनेचे नागपूर विभागीय सचिव हर्षल काकडे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जीवतोडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मल्ल्यारपण करून अभिवादन करण्यात आले आणि दीप प्रज्वलनाणे कार्यक्रमाची सुरुवात झाली.या प्रसंगी जेष्ठ शिवसैनिकांचा व नवनियुक्त शिवसेना-युवासेना पदाधिकारी  यांचा  सत्कार सोहळा पार पडला.
 या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड व चंद्रपूर युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी यांनी केले. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांच्या हस्ते वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महिला,पुरुष यांचा शिवसेना पक्षात प्रवेश कार्यक्रमात करण्यात आला. तसेच युवासेना नागपूर विभागीय सचिव हर्षल काकडे यांच्या हस्ते युवक व युवतींचा युवासेनेत पक्षप्रवेश घेण्यात आला.यावेळी भाजपा माजी नगरसेविका दिपाली टिपले यांचे पती किशोर टिपले यांना शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. सदर कार्यक्रमात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेनाचा आमदार निवडून आणू असा विश्वास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम साहेब व्यक्त केला. 
सत्ता असो कीवा नसो सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमीच कठीबद्ध असते असे प्रतिपादन शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी मार्गदर्शन करताना केले.
कार्यक्रमात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जेष्ठ शिवसैनिकांचा व नवनियुक्त पदाधिकारी यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेना जिल्हाप्रमुख मनिष जेठानी व संचालन युवासेना तालुका सनमव्यक वरोरा निहाल धोटे यांनी केले. शिवसेना विधानसभा संघटक  सुधाकर मिलमिले,माजी जिल्हा परिषद सदस्य दादा दहिकर,शिवसेना तालुका प्रमुख नंदु पढाल, शिवसेना तालुका प्रमुख विपीन काकडे,शिवसेना शहरप्रमुख संदिप मेश्राम, शिवसेना शहर प्रमुख घनश्याम आस्वले, शिवसेना तालुका संघटक बाळा क्षीरसागर, युवासेना जिल्हा सनमव्यक दिनेश यादव,जेष्ठ शिवसैनिक डाखरे ,शिवसेना उपतालुका प्रमुख राजु राऊत,शिवसेना उपशहर प्रमुख गजु पंधरे, उपशहर प्रमुख मनिष दोहतरे, उपशहर प्रमुख राहुल दारुण्डे, शिवसेना माजी नगरसेविका  सुषमा भोयर, शिवसेना उपसरपंच साधना मानकर,नगरसेविका प्रणाली मेश्राम,शिवसेना महिला संघटिका उपजिल्हा सनमव्यक  कीर्ती पांडे, शहर संघटिका माया टेकाम, युवती उपजिल्हा प्रमुख शिव गुडमलं,बंडु पाटेकर,अतुल नांदे, प्रसाद खडसान, कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगणे, शहर कामगार सेना प्रमुख बालू रुयारकर,युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे,युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर,युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे, युवासेना शहर प्रमुख गणेश जानवे, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय ताजने, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, युवासेना उपतालुका प्रमुख अमोल काळे, विनय पागरूत, रवी वाटकर  रोशन खोंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्विते सहकार्य केले.
कार्यकर्माचे आभार प्रदर्शन शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांनी केले.
 विधानसभा सनमवयक ज्ञानेश्वर डुकरे,शिवसेना शहर प्रमुख माजरी सरताज सिद्दकी, अमोल बावणे, युवासेना तालुका सनमव्यक सतीश आत्राम, युवासेना शहर प्रमुख माजरी पियुष सिंग, उपशहर संघटीका जोत्स्ना काळे, मनीषा जुनारकर,बंडु खैरे,ग्रा. सदस्य महेश देवतळे, शंकर धानकी,बंडु बोढे,अनिल गाडगे,वाल्मिक गौरकार, रवी कांबळे,समस्त पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments