घंटागाडीत आढळले नवजात अर्भक

घंटागाडीत आढळले नवजात अर्भक

भद्रावती : 
            स्थानिक नगरपालिका क्षेत्रातील घुटकाडा वार्ड येथील १२ नंबरच्या घंटागाडी मध्ये आज (दि.२९) रोज गुरुवारला सकाळी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात बालक (अर्भक) आढळून आले. कोणीतरी अज्ञाताने त्या घंटागाडी मध्ये अर्भक टाकले व ते मृत अवस्थेत आढळून आले आहे. 
            सदर बारा नंबरची घंटागाडी ही गुरुनगर, घुटकाडा, शिवरकर सोसायटी, दाते प्लॉट, ठेंगे प्लॉट, या परिसरामध्ये फिरते. या परीसरामधील ओला व सुका कचरा जमा करते. त्या गाडीमध्ये हे मृत बालक मिळालेल असल्याने एकच खळबळ माजली आहे.
            याबाबतीत जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments