विवेकानंद महाविद्यालयात लँडस्केपिंग या विषयावर अनुभवात्मक कार्यशाळा

विवेकानंद महाविद्यालयात लँडस्केपिंग  या विषयावर अनुभवात्मक कार्यशाळा


 भद्रावती :  स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील   हार्टिकल्चर विभागाच्या वतीने महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांकरिता  लँडस्केपिंग या विषयावर आधारित अनुभवात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कृषितज्ज्ञ प्रा. धनंजय बेलगावकर यांनी  या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.बेलगांवकर यांनी सांगितले की, जसजशा जमिनीच्या किमती वाढून राहिल्या आहेत तसतसी लँडस्केपिंगची मागणी वाढून राहिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी भांडवलात चांगले अर्थाजन करता येऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येईल. यासाठी  कोणकोणत्या वस्तू लागतात व त्या कुठे मिळतात त्याची माहितीही त्यांनी दिली. या उपक्रमाला  झाडांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्या झाडांची लागवड कशा प्रकारे करावी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याकरिता विद्यार्थ्यांनी  प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विस्तृत माहिती जाणून घेतली. या मार्गदर्शनाचा ३२ लाभार्थींनी लाभ घेतला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments