मॉर्निंग वॉक च्या अध्यक्षपदी ओम मांडवकर तर सचिव पदी बंडू देऊळकर

मॉर्निंग वॉक ग्रुपच्या निवडणुकीत ओम मांडवकर विजयी 
तर सचिवपदी बंडू देऊळकर 

अनिल पाटील/चेतन लूतडे

वरोरा : शहरातील अतिशय सन्मानाची समजली जाणारी मॉर्निंग वॉक ग्रुप आनंदवन च्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी पार पडली.
या निवडणुकीमध्ये डॉ सागर वझे, ओम मांडवकर, रूपेश जाजुर्ले असे उमेदवार उभे होते . अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत ओमप्रकाश मांडवकर 18 विरुद्ध 24 अशा प्रकारे विजयी झाले.

सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेली वरोरा शहरातील नामांकित मॉर्निंग वाक ग्रुप आनंदवनची  निवडणूक वरोरा शहरात चर्चेचा विषय ठरली होते. या संस्थेमध्ये डॉक्टर ,इंजिनियर,वकील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ,पत्रकार , कॉन्ट्रॅक्टर्स, राजकीय नेते,व्यावसायिक यांचा सहभाग असून निवडणुकीचे सर्व नियम पाळत निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सागर वझे यांचा पराभव करीत ओम मांडवकर यांनी बाजी मारली. ओम मांडवकर यांनी पहिल्या फेरी पासूनच आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर निर्णायक आघाडी घेतली होती. या निवडणुकीत  सचिव पदी बंडू देऊळकर यांची अविरोध निवड करण्यात आली.
सदर मतदान प्रक्रियेमध्ये ॲड मधुकर फुलझेले,नितीन मत्ते, पंकज नौकरकर, देवानंद गावंडे यांनी मतदान अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. दोन्ही विजयी उमेदवारांचे परिसरात कौतुक होत आहे.

Comments