राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शिवाजी महाराजांवरील केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शिवाजी महाराजांवरील केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन 
* महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कोशारी यांची हकालपट्टी करण्याची केली मागणी 
वरोरा : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करून पुन्हा एका नव्या वादाला जन्म दिला आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये राज्यपाल कोशारी म्हणाले की, शिवराय जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत. या पूर्वी राज्यपालांनी संभाजीनगर (औरंगाबाद) मध्येच दि २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दासनवमी निमित्त आयोजित समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात ‘चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही, तसेच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी वरोरा येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तर शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक प्रकाश वाघ व शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हासंपर्कप्रमुख प्रशांत कदम यांच्या निर्देशानुसार शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात राज्यपालाच्या विरोधातील जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
 शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे शेकडो शिवसैनिकांना सोबत घेऊन  कोश्यारीच्या बॅनरला जोडो मारून व घोषणाबाजी करून तीव्र आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानच्या जनतेचे शेवटपर्यंत आदर्श राहणार आहे. त्यांची विटंबना कुणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा याप्रमाणे समाचार घेऊन जाहीर निषेध करण्यात येईल असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.तसेच राज्यपाल कोश्यारी  यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावरून हकाल पट्टी करावी अशी मागणी याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केली.
यावेळी  शिवसेना शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, युवासेना जिल्हा चिटणीस मनिषभाऊ जेठानी, माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव,शिवसेना उपतालुका प्रमुख सागरभाऊ पिंपळशेंडे, जेष्ठ शिवसैनिक बंडुजी डाखरे,  उपशहर  प्रमुख मनिषभाऊ दोहतरे , उपविभाग प्रमुख शंकरभाऊ धानकी, युवासेना शहर प्रमुख गणेश जानवे, मंगेश तुरानकर , आशीष झाडे , अनिलभाऊ गाडगे, अतुलभाऊ नांदे,बंडू खैरे, किशोरभाऊ ढवस, सोनुभाऊ पिट्टलवार, दिपकभाऊ यादव,समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, शिवभक्त उपस्थित होते.

Comments