भद्रावती येथे आम आदमी पार्टी तर्फे निबंध स्पर्धा आयोजित

भद्रावती येथे आम आदमी पार्टी तर्फे निबंध स्पर्धा आयोजित 

आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे दिनांक 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर यादरम्यान संविधान सप्ताह  तसेच पार्टी स्थापना   म्हणून साजरा करण्यात येत आहे. तर या निमित्ताने दिनांक 21 नोवेम्बर ला जिल्हा परिषद आणि आंबेडकर  शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी निबंध स्पर्धेत ३५० ते ४०० विद्यार्थी यांनी आपला सहभाग दर्शविला.तसेच वर्ग पहिली ते बारावीपर्यंत  पर्यन्त च्या विधार्थी/ विधार्थिनिनशी संवाद साधण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल यांनी युवकांना संविधान वाचून समजुन घेणे किती गरजेचे आहे या बद्दल मार्गदर्शन केले. विधार्थी हेच समोरच्या काळातील नागरिक आहे त्यामुळे संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकाऱ आणि कर्तव्यांच्या कलमान विषयी माहिती असने देश विकासासाठी अति आवश्यक आहे. युवक जर भारतीय संविधानिक कलमांविषयी जागरूक राहिल तर युवाकांची कुठेही फसवनुक होणार नाही आणि युवक युवती समाजामध्ये संविधानाविषयी जनजागृती निर्माण करू शकतात आणि ज्या ठिकाणी सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे त्या त्या ठिकाणी युवक देशातील अशिक्षित  नागरिकांना न्याय मिळवून देऊ शकतात. म्हणून युवाकांमधे लोकशाही विषयी जानिव निर्माण होण्यासाठी  आम आदमी पार्टी तालुका व शहर भद्रावती यांच्या वतीने  निबंध स्पर्धेत "लोकशाही मजबूत करण्यासाठी युवकांची भूमिका" हा विषय ठेवला. निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्तेक विधार्थी ला प्रशस्तिपत्र देण्यात येईल तसेच उत्कृष्ट निबंध लिहीणाऱ्या विधार्थी / विधार्थीनीला बक्षिस/ परितोषिक देण्यात येईल. आम आदमी पार्टी तालुका कार्यकारिणी भद्रावती कबड्डी खेळ आयोजित करणाऱ्या मंडळ यांना सुद्धा मदत करत आहे. तालुक्यातिल विविध गावांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे तसेच चर्चा करुण मार्ग काढन्याचा   प्रयत्न करत आहे. काही स्थानिक कम्पन्यांमधे मजदुरांचे पगार देण्यात आले नाही त्यावर सुद्धा आम आदमी पार्टी सक्रियपणे काम करत आहे. हे संपूर्ण काम सोनाल पाटिल तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मार्गदर्शन मधे होत आहे आणि संपूर्ण आम आदमी पार्टी तालुका शहर भद्रावती चे कार्यकारिणी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सक्रियपणे काम करत आहे त्यामधे आम आदमी तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर तालुका सचिव सुमित हस्तक तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, तालुका संघटनमंत्री मारोति चापले तालुका सदस्य मारोति निखाडे, सचिन पाटिल शहर कार्यकारिणी मधील शहराध्यक्ष प्रफुल भाऊ शिलार, शहर संघटनमंत्री अनिल कुमार राम ,शहर  कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, शहर उपाध्यक्ष आशीष भाऊ तांडेकर,शहर सचिव विजय भाऊ सपकाळ तसेच इतर   कार्यकर्ते उपस्थित राहुन सक्रिय पणे काम करतात.

Comments