वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवसानिमित्त मित्र मेळाव्याचे आयोजन

डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवसानिमित्त मित्र मेळाव्याचे आयोजन 

वरोरा
चेतन लूतडे

कोरोना प्रादुर्भावामुळे बऱ्याच दिवसापासून आनंदवन ओसाड पडले होते. मात्र आता आनंदवन मित्रपरिवार व त्यांच्या चाहत्यांनी आनंदवन प्रेमी मित्रांसाठी मित्र मेळावा आयोजन 8 तारखेला करण्याचे ठरवल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टर विकास आमटे यांनी नुकतेच 75 वर्ष पूर्ण केल्याने आनंदवन मित्र परिवारातर्फे अमृत महोत्सव येत्या 8 तारखेला साजरा करण्यात येत आहे. यावेळी डॉक्टर तात्या लहाने, सरन्यायाधीश  शिरपूरकर , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहे. 

आठ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सकाळी वृक्षारोपण करून सुरुवात केली जाणार असून डॉक्टर विकास आमटे यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने स्वरानंद आर्केस्ट्रा नंतर संध्याकाळी  गजल गायक भिमराव पाचाळे यांचा गजल कार्यक्रम सुद्धा आनंदवन परिसरात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आनंदवन मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या मेळाव्यासाठी शकील पटेल, अजय स्वामी, डॉक्टर अशोक बेलकूडे, दगडू लोमटे  यांनी वरोरा येथे पत्र परिषद घेऊन आनंदवन प्रेमी मित्रांसाठी  या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

Comments