भद्रावती - तालुक्यात रेल्वे स्टेशनच्या पल्याड ढोरवासा येथील आंब्याच्या आंबराईत मोठ्या प्रमाणात कोंबड्यावर पैशाची बाजी लावून जुगार चालतो परंतु याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जुगार खेळणाऱ्याचे मनोबल वाढले आहे.
हिवाळा लागताच जिल्ह्यात कोंबड बाजार चालू झाला आहे त्याचप्रमाणे इतर तालुक्यात पोलिसांनी कारवाया सुद्धा केले आहे भद्रावतीत मात्र अजून पावतो पोलिसांनी कोंबड बाजारावर कारवाई केली नाही. रेल्वे स्टेशनच्या मागील भागात ढोरवासा येथील आंब्याच्या आंबराईचे बन आहे व त्याच्या बाजूला झुडपी जंगल आहे त्याचा फायदा घेऊन भद्रावती शहरातील काही व्यक्तींनी कोंबड्यावर पैशाचीबाजी लावून जुगार खेळण्याचा व्यवसाय सुरू केला आहे हा व्यवसाय सुरक्षित चालावा याकरिता गौराळा परिसरातील चौका चौकात लक्ष ठेवून माहिती देण्याकरीता परिसरात त्यांनी आपले मुखबीर नेमून येणाऱ्या पोलिसांवर तसेच इतर शासकीय वाहनावर नजर ठेवण्याचे काम त्यांच्याकडे दिले आहे. या कोंबड बाजारात यवतमाळ, वणी घुगुस, चंद्रपूर, भद्रावती परिसरातून मोठ्या प्रमाणात जुगारांची गर्दी असते यात लाखोंची उलाढाल होत असून बाजार भरविनाऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो येथे येणाऱ्या जुगाऱ्यांकरिता खाण्यापिण्याची सुद्धा सुविधा केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कोंबड बाजार या परिसरात चालू असून पोलिसांना याची माहिती का नाही याचा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
ठाणेदार गोपाल भारती - रेल्वे स्टेशन पल्याड ढोरवाचा येथील आंबराईच्या बनात कोंबड बाजार चालू असल्याबाबत ठाणेदार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तालुक्यात काही ठिकाणी कोंबड बाजार चालू असल्या बाबतची माहिती आली आहे याकरता पोलिसांचा शोध मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment