अन त्याने अजगराच्या तोंडातून वाचविले प्राण भद्रावती तालुक्यातील चिरादेवी तलावातील घटना.

अन त्याने अजगराच्या तोंडातून वाचविले प्राण
 भद्रावती तालुक्यातील चिरादेवी तलावातील घटना.
 भद्रावती -
  चीरादेवी तलावात शिंगाडा आणि मच्छीमारीसाठी गेलेला इसमाला अचानक अजगराने पायापासून गिडण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या हिमतीने त्याचा जबडा दोन्ही हातानेताणून  पाय बाहेर काढत आपले प्राण वाचविले. हि घटना आज दुपारला बारा वाजताच्या दरम्यान घडली बचावलेल्या युवकाचा वैद्यकीय उपचार सुरू आहे.
 राजू कवडू पचारे वय ४६ वर्ष राहणार झिंगुजी वार्ड भद्रावती असे बचावलेल्या युवकाचे नाव आहे राजू हा नेहमीप्रमाणे अकरा वाजता घरून चिरादेवी तलावाकडे गेला व त्यानंतर हवा भरलेल्या ट्यूबच्या साह्याने पाण्यात उतरला व पाण्यामध्ये मच्छीमारी साठी जाळे टाकल्यानंतर तो तलावातील मध्यभागी वेलातील शिंगाडा तोडत असताना अचानक तेथे असलेल्या बारा फूट लांबीच्या अजगराने राजूचा डावा पाय पकडला त्यामुळे अजगराचे दात हे पायात घुसले त्यामुळे राजू हा वेदनाहीन व भयभीत झाला त्याने आरडाओरड केली मात्र त्याच्या मदतीला तिथे कोणीच आले नव्हते अशा परिस्थितीत त्याने हिमतीने अजगराच्या शेपटावर उजवा पाय ठेवून नंतर दोन्ही हाताने त्याचा जबडा ताणून आपला डावा पाय बाहेर काढला तेव्हा तिथे पाण्यामध्ये रक्ताच्या धारा लागल्या होत्या तिथेच त्याने त्या अजगराला  पाण्यात पाडले व राजू हा कसाबसा तलावाच्या बाहेर निघाला व नंतर जखमी अवस्थेत तो आपल्या दुचाकीने भद्रावती गाठून शिंदे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाला डॉक्टराणि त्याला त्या अजगराबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केला सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून तो उपचार घेत आहे त्याच्या या हिमतीने सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Comments