राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांकरिता वरोऱ्यात प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
वरोरा दिनांक 2 नोव्हेंबर
वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लोकशिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने नुकतेच वरोरा शहरात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान राज्य ज्युनिअर गट आंतरविभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामधून निवड झालेल्या महाराष्ट्राच्या संघाच्या प्रशिक्षण शिबिराचे मंगळवार ला उद्घाटन लोकमान्य महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले
याप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळ पाटील, प्रशिक्षक देवानंद डुकरे आणि सागर कुरेकार तसेच वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे, प्राचार्य डॉ सुबोध कुमार सिंह आणि मुख्याध्यापिका स्मिता धोपटे यांची उपस्थिती होती
आपल्या मनोगतात आयुष नोपानी यांनी खेळाडूंनी सतत खिलाडी वृत्ती बाळगत बाळगावी आणि स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विलास टिपले यांनी आपल्या मनोगतात वरोरा शहर हे व्हॉलीबॉल चे माहेरघर असून अनेक नामवंत खेळाडू या शहराने देशाला दिल्याचे सांगत सांगितले. खेळाडूंनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महाराष्ट्राचे नाव उंचावावे याकरिता शुभेच्छा दिल्या, तर प्रा श्रीकांत पाटील यांनी ज्या शहरात खिलाडीवृत्ती असते त्या ठिकाणी शांतता नांदते असे सांगत लोकशिक्षण संस्थेचे व्हॉलीबॉल या खेळामधील योगदान अधोरेखित केले.
महाराष्ट्रातील आठ विभागातुन निवड झालेल्या 19 मुले आणि 15 मुलींचा समावेश या शिबिरात असून हा संघ 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान जम्मू येथे होत असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन जीवतोडे यांनी केले. संचालन डॉ प्रशांत खुळे यांनी तर आभार विनोद उमरे यांनी मानले
फोटो.... खेळाडूंसोबत उपस्थित मान्यवर
Comments
Post a Comment