नवरात्र पावन पर्वावर संताजी नगर महिला मंडळाने घेतला नाविण्यपुर्ण उपक्रम

नवरात्र पावन पर्वावर संताजी नगर महिला मंडळाने घेतला नाविण्यपुर्ण उपक्रम 

महिला मंडळाने दिले सोशल मिडीया फसवणूकीतुन बचावाचे धडे 

भद्रावती:-आजच्या युगात तंत्रज्ञानाला खुप महत्व आलय. जसे तंत्रज्ञानाचे फायदे तसेच त्याचे दुष्परीणाम सुध्दा आहेत. आपल्या अज्ञानामुळे आपले नुकसान होते, आपली फसवणूक सुध्दा होते. आपल्याला यापासून बचावाचे मार्ग माहिती नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही यामुळे मोठया प्रमाणात आपली फसवणूक होते व आर्थीक नुकसानसुध्दा होते व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

सोशल मिडीया, मोबाईलच्या माध्यमातून महीलांची व जनतेची होणारी फसवणूक, नुकसान यापासून कसे बचाव करता येईल व काय उपाययोजना करावी लागेच हीच मुख्य समस्या डोळयासमोर ठेवून संताजी नगर भद्रावती येथील सार्वजनिक शारदा महीला मंडळ यांनी नविण्यपुर्ण कार्यक्रम राबवीला.

सार्वजनिक शारदा महीला मंडळाने ईतर कार्यक्रमासोबतच २ ऑक्टो. ला गांधी जयंतीचे औचित्य साधून नवरात्रीच्या पावन पर्वावर "सायबर गुन्हा : सुरक्षीतता व उपाययोजना" या जटील विषयाला धरून महीला, मुली व जनतेकरीता मार्गदशन कार्यक्रमाचे आयोजन केले.
 
कार्यक्रमाला पोलीस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर येथील संबंधीत विषयाचे तज्ञ अश्वीनी वाकडे, पो. उप.नि., भरोसा सेल, व मुजावर अली, सायबर हायजीन एक्सपर्ट, सायबर पोलीस स्टेशन, हे मान्यवर लाभले यांचा मंडळाव्दारे शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. सोबतच मंचावर भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, संताजी नगर हनुमान मंदीर अध्यक्ष रितेश वाढई, सामाजिक कार्यकर्त्या उज्जवलाताई वानखेडे, जेष्ठ नागरीक अफजलभाई तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता सुर उपस्थित होते.

कार्यक्रमात भरोसा सेल च्या पो.उप.नि. अश्विनी वाकडे यांनी पोस्को कायद्याची सविस्तर माहिती दिली सोबतच महीलांवर कसे अत्याचार होतात, मुलींची कशी फसवणूक होत असते, आपण स्वता कसे सतर्क राहायचे, समाजानी कसे सतर्क राहून आपण कसे सुरक्षीत राहू शकतो व इतरांना कसे सुरक्षीत ठेवू शकतो यावर खुपच मोलाचे मार्गदर्शन केले. सायबर पोलीस स्टेशनचे सायबर एक्सपर्ट मुजावर अली यांनी आपल्या अमुल्य मार्गदर्शनामध्ये आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपली कशी फसवणूक होते, आपल्याला आर्थीक फटका व मानसिक त्रास का सहन करावा लागतो सोबतच यापासून कोणती उपाययोजना केल्याने आपण आपला बचाव करून कसे सुरक्षीत राहू शकतो यावर खुप सुंदर व मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी फसवणूक झाल्यावर कुठे कळवायचे, कसे कळवायचे याची माहिती दिली. आपल्या स्मार्टफोनचे सेटींग, सोशल मिडीया ॲपचे सेटींग कसे ठेवावे यांची सुध्दा प्रात्याक्षिक करून दाखवील व उपस्थित जनतेला ते करायला सुध्दा लावले. त्यासोबतच सायबर पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्यामार्फत माहिती पुस्तेक सुध्दा उपस्थित दर्शकाना वितरीत करण्यात आली. 

संबंधीत कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा डांगे तसेच आभार प्रदर्शन अंजली घीवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महीला मंडळाचे अध्यक्ष संगीता सूर, आशा तुमसरे, लता मत्ते, कवीता शेंडे, पोर्णिमा अंड्रस्कर, मेघा सहस्त्रबुध्दे, वर्षा मुसळे, मालूताई मस्के व ईतर मंडळाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. सोबतच संताजी नगर हनुमान मंदीर प्रशासन, श्री बजरंग गणेश मंडळ यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

Comments