मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भद्रावती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भद्रावती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

महाराष्ट्र राज्यात रुग्णासाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ८५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यवसायिक रक्तदात्याकडून भागवली जाते.

याकरिता भद्रावती येथे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जशने ईद ए मिलाद कमिटीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भद्रावती येथे नगरपरिषद च्या बाजूला सेवा दल मैदानात दिनांक आज ८ रोजी शनिवारला सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले होते.
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते मोठ्या सर्जरी मध्ये किंवा आजार परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचविण्यास मदत होते.
मानवतेचे उपकारक प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिकवणी तुमच्यामध्ये सर्वोत्तम व्यक्तिमत्व आहे जो लोकांना फायदा पोचविणारा आहे. गरजू व्यक्तीची मदत करणे महापुण्य आहे या कुरान धर्मग्रंथांमध्ये व पैगंबराचे शिकवणीला आचरण्यात आणून जशने ईद-ए- मिलादुन्नबी कमिटी भद्रावती तर्फे व तसेच प्रेरणा अंध विद्यालय घोट निंबाळा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना कपडे व भोजनदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख व या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, ठाणेदार गोपाल भारती, तहसीलदार अनिकेत सोनवणे, तसेच नगरसेवक हाजी जावेद शेख, जफर अहमद, हाजा शाहिद अली, अयफाज पठाण, परवेज अहमद, डॉक्टर शकील, रब्बानी शेख, नाझीम शेख आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व समाज बांधव युवा वर्ग या रक्तदानात शिबिरात उपस्थित होते.

Comments