भद्रावती : "उद्योजकता विकासात ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे योगदान" या विषयावर येत्या ६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता अनुभवात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या एकदिवसीय अनुभवात्मक कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रूरल चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष तथा जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोरा चे अध्यक्ष रमेश राजूरकर हे मार्गदर्शन करतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे सचिव अमन टेमुर्डे असतील. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या अध्यक्षतेत पार पडणाऱ्या या कार्यशाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उद्योजकता विकसित करण्याकरता सदर कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरेल याकरिता या कार्यशाळेचा महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयक्यूएसी चे समन्वयक प्रा. मोहित सावे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment