वरोरा
चेतन लूतडे
पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वरोरा तालुक्यातील दौरा माढळी गावासाठी दिवाळीची भेट ठरली. यावेळी बऱ्याच समस्यांना तात्काळ मार्गी लावून भाजप कार्यकर्त्यांच्या प्रश्नचे समाधान केले.
रविवारी चार वाजताच्या दरम्यान पालकमंत्री सुधीर भाऊ यांनी वरोरा येथील विश्रामगृहात भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेऊन बरेच प्रश्न मार्गी लावले. यावेळी वरोरा शहरातील प्रामुख्याने पाणी प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुकुंज आश्रम येथील सर्वाधिकारी लक्ष्मण गमे यांची नवनियुक्ती झाल्याबद्दल परिवारास भेट दिली. यादरम्यान बरेच गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर माढेळी येथील भाजपाचे कट्टर कार्यकर्ते स्वर्गीय ताराचंद हिकरे यांच्या परिवारास भेट देऊन आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. माढेळी येथील सरपंच देवानंद महाजन यांच्यासह ग्रामपंचायत मधील बऱ्याच समस्यांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये प्रामुख्याने वरोरा ते वडकी सिमेंटीकरन रोड नव्याने बांधण्याची मागणी करण्यात आली. याचबरोबर सभागृह आणि शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा संबंधित प्रश्न मांडण्यात आले होते.
या सर्व समस्यांना पालकमंत्र्यांने समाधान केल्याने व स्वर्गीय ताराचंद हीकरे यांच्या नावाच्या सभागृहासाठी अंदाजे 75 लाखाचे समाजभवन व ग्रामपंचायत इमारत देण्याचे मान्य केल्याने माढळी परिसरातील जनतेसाठी दिवाळीची भेटच ठरली.
दिवाळीपूर्वी अतिवृष्टीत पीक नष्ट झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने निधी जाहीर केला होता मात्र अजून पर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला नसल्याने संबंधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाचे पैसे वळते झाले पाहिजे असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी पालक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत बाबा भागडे, अमित चवले, देवानंद महाजन, रोहिणी देवतळे, केशवराव बोरीकर,सतीश मोहता,सुनील देव तळे,सुनील वारेकर,दिनकर डंभारे,विवेक डंभारे,उपेंद्र हिकरें,सुरेश महाजन,विलास गायानेवर,आशिष रणदिवे,अक्षय भिवदरे,निलेश देवतळे, बाळाभाऊ भोयर,जगदीश तोटावर तसेच मा ढेली ग्रामपंचायत सदस्य राजेश सवाई,उपसरपंच सौ वनिता हुलके,सौ.सुनीता भडगरे,अमोल काटकर,येडमे,सौ दरवरे,महेश देव तळे,भद्रावती येथील चंद्रकांत गुंडावार ,वरोरा रेस्ट हाऊस ला मा.न.प.अध्यक्ष अहेतेशाम अली.या शिवाय बरेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment