भद्रावती
दिनांक 9 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी निमित्याने आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यां कडून एका त्यागयुक्त, निस्वार्थी, दीर्घकाळ, आनागरिक, कोल्हापूर जिल्हा, इचलकरंजी येथील 40 वर्ष धम्मसेवा केलेल्या 65 वर्षीय रहिवासी विजय कांबळे यांना ऐतिहासिक बुद्ध लेणी विजासन येथे शाल आणि पुष्पगुछ देऊन सम्मानित करण्यात आले. त्यांनी मागील 25 सप्टेंबर ला कोल्हापूर येथून सायकल वारी काढली आणि 5 ऑक्टोबर ला अशोक विजयादशमी च्या दिवशी ते दीक्षाभूमी नागपूर या पावन भूमी ला पोहोचले. तसेच आज विजासन लेणी ला पोहोचल्या नंतर आम आदमी पार्टी चे दिग्गज कार्यकर्ते जिल्हा संघटन मंत्री परमजीत सिंग झगडे, तालुका अध्यक्ष सोनल पाटील, व यांचे वडील शिवदास पाटील, बाळकृष्ण वेले, तालुका मीडिया प्रभारी रितेश नगराळे, शहर सहसचिव सरताजभाई शेख, श्याम पिंपळकर, पुरुशोत्तम लिपटे, आदेश फुलझेले यांनी मिळून आपले कर्तव्य पार पाडले.
Comments
Post a Comment