मॉर्निंग वॉक ग्रुप चा दिवाळी पहाट सोहळा स्वरसंगीताने साजरा , सामाजिक संस्थांनी भारतीय संस्कृतीचे जतन करून समाजमन घडविणे आवश्यक -- सुवर्णरेखा पाटील

सामाजिक संस्थांनी भारतीय संस्कृतीचे जतन करून समाजमन घडविणे आवश्यक -- सुवर्णरेखा पाटील 

मॉर्निंग वॉक ग्रुप चा दिवाळी पहाट सोहळा स्वरसंगीताने साजरा

* दिवाळी स्वरसंध्या कार्यक्रमातून आवाहन
वरोरा : या शहराला सामाजिक सेवेचा वारसा लाभलेला आहे. त्यातूनच अनेक सामाजिक संस्था पुढे येऊन सामाजिक उपक्रम राबवीत.भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी अशा सामाजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे असून त्यातूनच समाजमन घडविले जाऊ शकते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णरेखा पाटील यांनी दिवाळी-स्वरसंध्या या संगीताच्या कार्यक्रमा प्रसंगी केले.
  सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मॉर्निंग वॉक ग्रुप आनंदवन च्या वतीने दिवाळी- स्वरसंध्या या सांगितमय कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रांगणात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमातील एकापेक्षा एक सुरेल गीतांच्या या मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णरेखा पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून  मंचावर आनंदवनातील वैद्यकीय अधिकारी डॉ विजय पोळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे,चित्रपट निर्माते अनिल वरखडे,मॉर्निंग वॉक ग्रुप आनंदवनचे अध्यक्ष बाबा आगलावे, सचिव पंकज नौकरकर,माजी अध्यक्ष डॉ सागर वझे,श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थाचे संचालक परीक्षित एकरे , शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते उपस्थित होते. 
        सदर कार्यक्रमाला संबोधित करतांना लक्ष्मण गमे यांनी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक करीत वरोरा शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत विविध संस्थांच्या सहभागाचे योगदान अधोरेखित केले. सुवर्णरेखा पाटील यांनी सुरेल आवाजात"दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना ; शुभंकरोती म्हणा, मुलांनो शुभंकरोती म्हणा" या गीताच्या ओळी गाऊन वरोरा शहर हे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे माहेरघर आहे. आजपर्यंत हा वारसा विविध संस्थांनी जपला असे सांगत नवोदित कलावंतांनी आणि संस्थांनी पुढे येऊन ही परंपरा कायम ठेवावी असे आवाहन  केले. स्वर सरगम म्युझिकल संच नागपूर च्या कलावंतांनी सादर केलेला कार्यक्रम रसिकांसाठी मेजवानी ठरला. भावगीत, भक्ती गीत, भजन आणि सिने गीतांनी भरगच्च असलेल्या स्वरांच्या या मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. प्रणय कुथे, अंकिता टकले आणि आनंद बेदरकर यांनी मैफिलीत स्वरसाज चढविला, तर श्रद्धा पोफळी यांनी उत्तम निवेदन केले. परिमल जोशी यांनी कीबोर्डवर, पंकज यादव ढोलक तर विशाल यांनी ऑक्टोपॅड वर साथ दिली.वरोरा येथील संजय वैद्य यांनी सादर केलेल्या "जाने कहा गये वो दिन" या अंतिम गीताला  रसिकांनी भरभरून दाद दिली. मॉर्निंग वॉक ग्रुप आनंदवनची निर्मिती समीर बारई यांनी २००६ मध्ये केली होती. तेव्हा या ग्रुपमध्ये २२ सदस्य होते. आता ही सदस्य संख्या पन्नास वर पोहोचली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना काळात निधन झालेले मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य दिलीप नगराळे, विनोद चिकाटे, राजू उईके आणि वसंतराव कापसे या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक कार्यात लक्षणीय योगदान देणाऱ्या लक्ष्मण गमे , आनंदवन येथील वैद्यकिय अधिकारी, डॉ विजय पोळ, चित्रपट निर्माते अनिल वरखडे, परीक्षेत एकरे ,  कोरोना संकटात रुग्णांना प्राणवायू पुरवून शेकडो नागरिकांचे प्राण वाचविणारे गांधी उद्यान योग मंडळचे दादा जयस्वाल,प्रवीण सुराणा,जयंत मारोडकर, मनोज कोहळे,शैलेश शुक्ला,सचिन जीवतोडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.तसेच  क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, ओंकार चट्टे आणि  शीतल पाचभाई यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.नितीन मत्ते यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मॉर्निंग वॉक ग्रुप आनंदवन च्या कार्याचा आढावा सादर केला. तसेच यापुढे देखील मॉर्निंग वॉक ग्रुप समाजकार्यात अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रशांत खुळे यांनी केले. तर डॉ सागर वझे यांनी आभार मानले. मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांची आणि रसिकांची मोठी उपस्थिती यावेळी होती.

Comments