ड्युटी वरून घरी परत असताना पट्टेदार वाघाने हल्ला करून युवकाला केले ठार. मिळालेल्या माहितीनुसार दिपू सिंग महतो असे मृतकाचे नाव असून आणि वय 37 अशी आहे. दीपक हा एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होता.ही सदर घटना माजरी येथे डब्लू सी एल खदान नंबर 2 पाशी साडेनऊ वाजता घडली. पट्टेदार वाघाने युवकावर अचानक हल्ला चढविला आणि काही अंतरावर फरफटत ओढत नेऊन ठार केले. या घटनेची माहिती वन विभागाला तात्काळ देण्यात आली आहे.दिवसेंदिवस वाघाच्या संख्येत वाढ होत असून, संगोपनारिता जंगल कमी पडत आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावाच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वनविभागाने त्वरित उपाय योजना करून हिंस्त्र पशुचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
Comments
Post a Comment