कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

वरोरा टोल नाक्या जवळील शहरात येणाऱ्या रोड लगत नाल्यामध्ये मृतदेह आढळला.पोलीस तपास सुरू.

वरोरा टोल नाक्या जवळील शहरात येणाऱ्या रोड लगत नाल्यामध्ये मृतदेह आढळला.
पोलीस तपास सुरू.

चेतन लूतडे 24/10/22

आज सोमवारी सकाळी वरोरा येथील वनी कडे जाणाऱ्या टोल नाक्या जवळील पुलाखाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून अजून पर्यंत या इसमाची ओळख पटलेली नसून मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यासाठी वरोरा पोलिसांना कळविले असून वरून पोलीस तपास करणार आहे.
सध्या मृत्यूचे कारण कळले नसून हा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments