विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 02 ऑक्टोबर, 2022 रोज रविवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती महाविद्यालयातील श्री अरविंद सभागृहात  साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. मंचावर प्रा. डॉ. राजेश सूर (आर. डी. कॉलेज, आल्लापल्ली) सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. बंडु जांभूळकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ‌उत्तम घोसरे उपस्थित होते. यावेळी  डॉ. सूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यासोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.उमाटे यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री  यांच्या  कार्याचा आदर्श समोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असा मौलिक संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल ठाकरे तर आभारप्रदर्शन डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments