भद्रावती येथे घनश्याम नगरीत सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

भद्रावती येथे घनश्याम नगरीत सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

भद्रावती चे विकास पुरुष म्हणून ओळख असणारे श्री. अनिल भाऊ धानोरकर आणि सौ. वंदना ताई अनिल धानोरकर, यांच्या उपस्थितीत, घनश्याम नगरी येथील कुमारी शिवानी यशवंत लिपटे,हिची कॅपजे मिनी येथे निवड झाल्याबद्दल आणि कुमारी माही राजेश खोब्रागडे,हिने नुकत्याच नागपूर येथे ओपन स्केटिंग चॅम्पियनशिप 200 मीटर,मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल तसेच डिफेन्स फॅक्टरी तर्फे दुर्गाउत्सव समितीच्या वतीने गर्भा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेत आम्हच्या घनश्याम नगर येथील Raising star महिला मंडळींनी दुसरा क्रमांक पटकाविला,यांचे सर्वांचे पारितोषिक देऊन श्री अनिल भाऊ धानोरकर आणि सौ.वंदनाताई अनिल धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहेत,सोबतच श्री राजेश जी खोब्रागडे, यांच्या   सिम्पनी म्युझिकल नाईट यांच्या कार्यक्रमांनी आणि गायक श्री विजय जी पारखी यांच्या गाण्याने सर्वांना नाचविले आणि सर्वांचे मन मोहित करून टाकले. 
ह्या कार्यक्रमासाठी घनश्याम नगर येथील सोसायटीचे अध्यक्ष सिकंदर शेख, उपाध्यक्ष नीलेश सातपैसे, सचिव राजेश खोब्रागडे, सह सचिव किरण इंदोरकर,कोषाध्यक्ष उत्तम स्वार आणि तिमिर मसीद सर्व सदस्यांनी आणि समस्त महिला मंडल यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Comments