अखेर तो बिबट अडकला वन विभागाच्या पिंजऱ्यात

अखेर तो बिबट अडकला वन विभागाच्या पिंजऱ्यात

भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी परिसरात येथे काल साडेदहाच्या सुमारास एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबद झाला आहे.
प्रवण क्षेत्र असल्याने बिबटे या क्षेत्रात नेहमी दिसतात. सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान बिबट्याच्या डरकाड्या परिसरातील लोकांना ऐकल्या आल्या. या क्षेत्रात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याच्या वावर वाढला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. गेली 20 ते 30 दिवस बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या आयुध निर्माणीतील वासियांनी अखेर सुटकेच्या श्वास घेतला आहे . मागील काही दिवसापूर्वी शक्य असलेला हाच बिबट्या असावा कारण त्याने प्राप्ती नन्नावरे व विदिशा गायकवाड या दोन चिमुकलीवर हल्ला करून जखमी केले होते. या दोन्ही मुली आपल्या परिसरात क्वार्टर मध्ये अंगणात खेळत असताना बिबट्याने घात घालून हल्ला केला होता. बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर नागरिक पहात असताना बिबट्या पिंजऱ्यात धडकल्याने तो किरकोळ जखमी झाल्याचे दिसत होते. वन विभागाद्वारे वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला  रोप वाटिकेत ठेवण्यातआले आहे. यादरम्यान विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनात तसेच भद्रावती वनपरिक्षेत्रतील अधिकारी हरिदास शेंडे, सहाय्यक वन संरक्षक निकिता चौरे सा्रड एनजीओ चे अनुप येरणे, शैलेश पारेकर, अमोल कुचेकर, श्रीपाद भाकरे आणि पंकज कुचेकर उपस्थित होते.

Comments