सकल जैन समाजाच्या वतीने जैन मंदिरात कार्यरत 125 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकल जैन समाजाच्या वतीने जैन मंदिरात कार्यरत 125 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

भद्रावती : जैन श्वेतांबर तीर्थ मंडळात परमपूज्य मुनिराज प्राश्‍मरती विजयजी म.सा यांच्या पावन उपस्थितीत चातुर्मासाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. भद्रावती सकल जैन समाज व मंदिरातील सर्व कर्मचारी महाराज साहेबांच्या प्रवचनाने मंत्रमुग्ध झाले. भद्रावती सकल जैन समाजातर्फे जैन मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांचा आदरातिथ्य कार्यक्रम महाराज साहेबांच्या पावन उपस्थितीत संपन्न झाला. सर्व पुरुष कर्मचाऱ्यांना ₹ 500 रोख व ड्रेस आणि महिला कर्मचाऱ्यांना साडी व ₹ 500 भेट देण्यात आली. तर ही भेटवस्तू म्हणून मिळालेल्या या भेटीमुळे जैन मंदिरातील कर्मचारी खूप खूश झाले. दिवाळीच्या सणा निमित्त सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या सन्मानाने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांना महाराज साहेबांनी आपल्या मधुर प्रवचनाने शिकवले. आणि म्हणाले तुम्ही भद्रावती सारख्या पार्श्वनाथाच्या पावन भूमीत रहात आहात त्यामुळे या मंदिरात रोज येताना देवाला नमस्कार करावा. साहेब म्हणाले की प्रत्येक मानवाने आयुष्यात तंबाखू दारू मांसाहार सोडला पाहिजे,आणि तुमच्या सुख-समृद्धीमध्ये भरभराट होण्यासाठी, भगवान पार्श्वनाथांच्या दारात येऊन देव सर्वांचे म्हणणे ऐकतो आणि मनुष्याच्या जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते, म्हणून तुम्ही जिथे असाल तिथे नेहमी भगवंताचे नामस्मरण करत राहावे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल जैन समाजाचे संतोष गोलेच्छा राजेश कोठारी, बबलू कोठारी, राजकुमार लुणावत, साहिल लुणावत, रिद्धी सिध्दी बछछवत, कशिश बछछवत, वीर बछ्छवत, हरीश बोरा, दिनेश लुणावत, कुणाल लुणावत, राज व रोहिल गोलेचा, मनमोहन गोलछा , दीपक कोचर, मंगल कोचर, राजेश कोचर, सागर, संचेती, आनंद मुनोत जैन मंदिराचे व्यवस्थापक भिकमचंद बोरा आदी उपस्थित होते आणि आभार कर्मचारी विठ्ठल घोटेकर यांनी केले.

Comments