वरोरा येथील धक्कादायक घटना : स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरला आग, शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

वरोरा येथील धक्कादायक घटना : स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरला आग,  शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बातमी:17/4/26 वरोरा (जि. चंद्रपूर) – साई नगर, वरोरा येथील जयंत मोतीराम दातारकर यांच्या घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत रेखा जयंतराव दातारकर यांच्या पायाला किरकोळ इजा झाली असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा दातारकर या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. या अचानक झालेल्या प्रकारामुळे घरात घबराट निर्माण झाली. त्यांनी तात्काळ आरडाओरड केल्याने शेजारील नागरिक धावून आले. प्रसंगावधान राखत शेजाऱ्यांनी जळत असलेला सिलेंडर घराबाहेर काढला व सुरक्षित ठिकाणी नेऊन रेतीच्या ढिगाऱ्यावर टाकला. यानंतर सिलेंडरमधील गॅस बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यात यश आले. या घटनेत रेखा दातारकर यांच्या पायाला किरकोळ भाजल्या गेल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवि...

रवि शिंदे माढेळी व शेगाव येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ए.टी.एम. मशीनचे लोकार्पण

कास्तकार जगला तर समाज जगेल : रवि शिंदे

माढेळी व शेगाव येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ए.टी.एम. मशीनचे लोकार्पण

वरोरा : 
         यावर्षीची परिस्थिती पाहता शेतीला यावर्षी सुगीचे दिवस राहील असे वाटत नाही.  अतीवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यात राज्य शासन देखील वारंवार मागणी करून एकरी मदत देण्यास अनिर्णीत आहे. पीक कर्ज जर एकरी मिळते तर मदत देखील एकरी मिळावी, अशी मागणी आहे. मात्र निसर्ग व शासन दोन्हीही शेतकऱ्याला मारक ठरेल तर शेतकऱ्यांचा वाली उरणार नाही. अशा परिस्थितीत कास्तकार जगला तरच समाज जगेल, असे विचार रवि शिंदे यांनी मांडले. निमित्त होते माढेळी व शेगाव येथे ए.टी.एम. मशीन लोकार्पनाचे...
          चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा माढेळी व शाखा शेगाव येथे नागरिकांना सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ए.टी.एम. मशीनचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज (दि.२८) ला घेण्यात आला. यावेळी रवि शिंदे बोलत होते.
          यावेळी आयोजित कार्यक्रमात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे उद्घाटक होते. प्रमुख उपस्थिती डॉ. विजय देवतळे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रकाशबाबु मुथा, दत्ता बोरेकर, दामोधर रुयारकर, माढेळी ग्रामपंचायत सरपंच देवानंद महाजन यांची होती. तर कार्यक्रमाला विभागीय अधिकारी राजीव पिंपळापुरे, सुधीर धात्रक, साहेबराव काकडे, सुधीर धामट, बाळू भोयर, गजानन बजाईत, धनराज तळवेकर, अजय चटप, भीमराव वाटकर, चेतन महाजन, प्रभाकर हणवते, नरेश चौधरी, हस्तीक ताजने, मनोज शेळकी, विठ्ठल हणवते, पंढरी श्रीरामे, गोपाळराव चौधरी, सौ. रंजना वरभे, जीवतोडे, राऊत, जांभुळे, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सभासद, ग्राहक आदी उपस्थित होते.

Comments